मी लहान असताना, गावच्या नदीमध्ये पोहायला जायचो मित्रांसोबत. जोवर पोहता येत नव्हतं तोवर कडेकडेला डुंबायचो नुसता. पण अस कडेला डुंबणं करताना मोठ्या मुलांचा एक कार्यक्रम पाहताना भारी वाटायचं. तो कार्यक्रम म्हणजे ठाव काढणं. ठाव काढणं म्हणजे काय तर नदीच्या तळापर्यंत जाऊन, जिथे नदी सर्वात जास्त खोल आहे अश्या ठिकाणी , नदीच्य तळापर्यंत जाऊन तेथील दगड, वाळु इत्यादी पाण्यावर आणुन सर्व मित्रांना दाखवणे. नदीचा ठाव काढण्यता मी देखील नंतर पारंगत झालो म्हणा, पण ठाव काढण्याचा आमचा तो कार्यक्रम आज आठवायचं कारण म्हणजे भारताने अवकाश संशोधनात घेतलेली गरुडझेप. भारत आता अतंरिक्षाचा ठाव काढण्याचा कार्यक्रम करीत आहे. लहान वयाच्या त्या मुलांमध्ये जशी उत्सुकता असते ठाव काढण्याची , आत्ताच्या भारतात देखील तशी उत्सुकता आणि उमेद आहे. चंद्रयान ३ आणि आता आदित्य एल वन च्या निमित्ताने चला आपण देखील प्रयत्न करुयात अंतरिक्षाचा ठाव घेण्याचा.

Hemant Vavale - Camping near Pune

Hello There!

Meet Hemant Vavale, the author of this article

He, with all passion and love towards nature and outdoors he started a social enterprise as Nisargshala. 

Basic mountaineering course ,  at Nehru Institute of Mountaineering Uttarkashi. More than 20 years of outdoor experience include trekking, rock climbing, Himalayan expeditions, leisure tours, wild life excursions.

A former teacher, social activist, an IT professional and weekend camper, has developed a methodology for all to establish the bond between an individual and mother nature, and encapsulated the same as Nisargshala.

He has actively participated many social awareness drives and led some. Since 1996, He has been involved in different activities regarding environment awareness, tree plantation, seed planting drives in Mulshi, Maval and Velhe Talukas of Pune district.

As a teenager, he started his experiences with nature under the guidance of  pioneers in environment movements like Gulab Sapkal, Jagdish Godbole, Anand Palande.

Exploring deep sky

अंतरिक्षाचा ठाव - आदित्य एल वन नक्की जाणार कुठे?

वर्ष २०२१ मध्ये नासा आणि अन्य दोन वैज्ञानिक संस्थांनी जेम्स वेब नावाची एक भलीमोठ्ठी (सर्वात मोठी) दुर्बीण आकाशात प्रक्षेपित केली. भली मोठ्ठी म्हणजे किती मोठी? हे आपण आधी समजुन घेऊयात. कोणतीही दुर्बीण बनवताना त्यातील मुख्य घटक असतो त्या दुर्बीणीमध्ये बसविण्यात येणारा मुख्य आरसा. याला इंग्रजीत प्रायमरी मिरर म्हणतात. हा आरसा जितका मोठा असेल तितकी जास्त निरीक्षणं आपण करु शकतो. दुर्बीणींचा शोध सुरुवातीस लागला तो दुरवरील प्रदेशातील शत्रु सैन्य पाहण्यासाठी आणि नंतर गॅलिलियो ने या तंत्रामध्ये सुधारणा करीत , थोडा मोठा आरसा वापरुन पहिली खगोलीय दुर्बीण बनवली. याच दुर्बीणीने पाश्चात्य जगतातील खगोलाविषयीच्या सर्व कल्पनांना अक्षरशः सुरुंग लावले. परिणामी गॅलीलीला आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. असे काय शोधले त्याने दुर्बीणीतुन की त्या काळी त्याला अशा शिक्षेला सामोरे जावे लागले? तर त्याने सतराव्या शतकाच्या पुर्वार्धात सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन, पृथ्वी सुर्याभोवती फिरते आहे असा दावा केला. अर्थात त्याच्या या वैज्ञानिक शोधाला धर्माचा अवमान असे दुषण लावले गेले आणि त्याला अटकेत रहावे लागले, अटकेत असताना त्याला अंधत्व आले, आजारी पडला आणि त्याचा अंत झाला. तर गॅलीली ने एखादी दुरवरची वस्तु वीस पट मोठी दिसेल इतक्या क्षमतेची दुर्बीण बनविली. यातुनच त्याने गुरु ग्रहाचे चंद्र पाहिले. सुर्यकेंद्रीत ब्रह्मांडाची कल्पना मांडली.

सोन्याचा मुलामा देण्याच काम सुरु असलेला जेम्स वेब स्कोप

तर मुद्दा असा की दुर्बीणीचा आरसा जितका मोठा तितकी निरीक्षणे अधिक चांगली आणि परिणामकारक करता येतात. कालौघात दुर्बीण अधिक उत्क्रांत होत गेली. आरसा कशाचा असला पाहिजे, त्यावर कशाचा मुलामा दिला तर चित्रे अजुन चांगली दिसतील अश्या अनेक गोष्टींमध्ये संशोधने झाली. हल्ली आपण ज्या दुर्बीणी वापरतो त्या गॅलिलिओ ने वापरलेल्या दुर्बीणींपेक्षा खुपच प्रगत आहेत.

निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत.

जेम्स वेब पुर्वी सर्वात मोठी दुर्बीण कोणती होती?

एडविन हबल या शास्त्रज्ञाच्या नावाने वर्ष 1990 मध्ये नासा ने हबल नाव ठेवलेली दुर्बीण आकाशात सोडली. या दुर्बीणीचा मुख्य आरसा किती फुटाचा होता बरे? तर तो होता सात फुट आणि आठ इंचाचा. आता विचार करा यातुन जे खगोल पिंड दिसतील ते किती सुंदर आणि स्पष्ट दिसतील.  हबल नावाची ही दुर्बीण आहे कुठे? तर ही दुर्बीण आहे पृथ्वीच्या कक्षेत, पृथ्वीपासुन वर (खरतर अवकाशात वर खाली अस काही नसत मंडळी) साधारण साडे पाचशे किमी अंतरावर. इतक्या अंतरावरुन हबल दुर्बीण पृथ्वीला दररोज किमान 15 प्रदक्षिणा घालत असते. जवळजवळ तीस वर्षांपेक्षा जास्त काळ ही दुर्बीण अजुनही कार्यरत आहे. आजवर आपण अवकाशाचे, खगोलाचे जे काही भन्नाट फोटो पाहिले आहेत त्यातील बहुतांश हबल ने काढलेले आहेत. हबल ने मानवाची बघण्याची क्षमता कमालीची वाढवली. इतकी आपण सौरमंडलाच्या बाहेर, दुरस्थ अंतराळातील अनेक खगोल पिंड पाहु शकलो. मागील वर्षी हबल ने नोंदलेला एक तारा पृथ्वीपासुन चक्क 2800 करोड प्रकाशवर्षे इतका दुर आहे. या ता-याचे अनुमानित वय बाराशे कोटी वर्षे इतके असावे त्याचे नामकरण इरेंडेल असेल केले गेले. आपल्या सुर्याचे वय साधारणे साडेचारशे करोड  वर्षे इतके आहे.  इरेंडेल या ता-याचे हे वय लक्षात ठेवा म्हणजे पुढे वाचताना याचा उपयोग होईल.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की जमीनीवरील दुर्बीणीतुन आपण आय पीस मधुन मुख्य आरश्यावर उमटलेली चित्रे पाहु शकतो तर मग या आकाशात असलेल्या दुर्बीणीतील चित्रे कोण पाहतं, कस पाहतं? मनुष्य प्रत्यक्ष , वास्तवात म्हणजे रीयल टाईम मध्ये हे प्रतिबिंबे पाहु शकत नाही. पण या दुर्बीणीला मोठ्या आरश्यासोबतच उच्च तंत्रज्ञानाचे, विकसीत असे कॅमेरे लावलेले आहेत. अवकाशात कोणत्या दिशेला पहायचं, किती काळ पहायचं याविषयीच्या आज्ञा पृथ्वीवरुन शास्त्रज्ञ करु शकतात. कॅमे-यांमुळे दुर्बीणीला जे दिसते त्याचे फोटो काढता येऊ शकतात पाहिजे तेव्हा, पाहिजे तितका वेळ. ही निरीक्षणे मग पृथ्वीकडे पाठवली जातात आणि इथे त्यावर अभ्यास करुन अचुक छायाचित्रे बनविली जातात. हबल ने आजवर चाळीस हजारांवर खगोल पिंड मनुष्यास दाखवले आहेत. हे चाळीस हजार पिंड , दृश्ये अशी आहेत की जी  पृथ्वीवरुन दिसु शकली नसती किंवा हबल मुळे जितकी स्पष्ट दिसली तितकी स्पष्ट दिसु शकली नसती. तीस वर्षे उलटुन देखील अजुनही हबलची सेवा सुरुच आहे.

जेम्स वेब म्हणजे काय आहे लौकर समजावे म्हणुन थोडक्यत हबल विषयी माहिती दिली.

आता आपण पुन्हा जेम्स वेब कडे वळुयात. जेम वेब म्हणजे हबलचेच अधिक विकसीत रुप आहे, संस्करण आहे. अधिक विकसीत म्हणजे किती विकसीत ते आपण थोडक्यत समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात. जेम्स वेब मध्ये जी दुर्बीण आहे तिचा मुख्य आरसा एकवीस फुटांपेक्षा मोठा आहे. कल्पना करा किती स्पष्टता असेल जेम्स द्वारे मिळणा-या छायाचित्रांमध्ये. हबल चा आरसा सात फुट आणि आठ इंचाचा आहे, तर मग जेम्स वेबचा आरसा एकवीस फुट सहा इंचाचाच का बरे बनविला असेल? वीस फुटांचा का नाही किंवा पंचवीस फुटांचा का नाही?

याचे कारण वर लिहिलेल्या इरेंडेल या ता-याच्या अंतराशी निगडीत आहे. अर्थात इरेंडेलचे चित्रण हबल ने अगदी अलीकडे केले आहे. हबल द्वारे इरेंडेल जितक्या अंतरावर आहे तितक्या अंतरावरील दृश्ये पाहता येतील असे अपेक्षित नसताना हबल द्वारे तेहतीस वर्षांनंतर इरेंडेल चे दृश्य पहायला मिळाले. जेम्स वेब ची कल्पना , आराखडा वर्ष २००४ मध्ये बनला. तेव्हापासुन चौदा देशातील अभियंते, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ जेम्स वेबच्या निर्मितीचे कमा करीत आहेत. जेम्स वेबचा आरसा अमुक तमुक इतकाच का करायचा याचा संबंध जेम्स वेब दुर्बीणीची पाहण्याची क्षमता अधिकाधिक वाढवता कशी येईल याच्याशी आहे.

गेली शंभरेक वर्षे आपण म्हणजे आधुनिक विज्ञान असे मानत आहे की आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आजपासुन जवळ जवळ चौदाशे कोटी वर्षांपुर्वी झाली. एक महाविस्फोट झाला आणि ब्रह्मांड जन्माला आले. खरतर हे इतके सोपे नाहीये समजायला कारण महाविस्फोट म्हणजेच बिग बॅंग होतानाचा काळ आणि क्रिया प्रक्रिया यांचा देखील विचार शास्त्रज्ञांनी केला आहे. आपण इतक्या खोलात जावयास नको. आपण इतकेच समजुयात की महाविस्फोट झाला आणि ब्रह्मांड निर्माण झाले. मग ते विस्तार पावु लागले.त्यातुन ता-यांची निर्मिती झाली, दीर्घिकांची निर्मिती झाली. आपली आकाशगंगा (दुग्धमेखला) ही देखील एक दीर्घिकाच आहे. त्या दीर्घिकांमध्ये अजुन तारे, ता-यांभोवती ग्रह, ग्रहांभोवती उपग्रह तयार झाले. नवनवीन खगोल पिंड बनण्याची क्रिया अजुनदेखील सुरुच आहे. जस आपण वर समजुन घेतलं की प्रत्येक खगोल पिंड कधी ना कधी बनतो म्हणजे त्याचा जन्म होतो. तो कधी बनला आहे , त्याचे वय किती असावे हे शोधुन काढण्यासाठीची निरीक्षणांवर आधारलेली गणिते मांडली जातात. म्हणजेच काय प्रत्येक पिंडाचे वय असते, जसे आपले असते ना, अगदी तसेच. तर जेम्स वेब च्या माध्यमातुन शास्त्रज्ञांना ब्रह्मांडाच्या उत्पतीच्या वेळी जन्माला आलेले खगोल पिंड पहायचे असल्याने जेम्स वेबचा आरसा विशिष्ट मोजमापाचा बनविला गेला.

गेली शंभरेक वर्षे आपण म्हणजे आधुनिक विज्ञान असे मानत आहे की आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आजपासुन जवळ जवळ चौदाशे कोटी वर्षांपुर्वी झाली. एक महाविस्फोट झाला आणि ब्रह्मांड जन्माला आले. खरतर हे इतके सोपे नाहीये समजायला कारण महाविस्फोट म्हणजेच बिग बॅंग होतानाचा काळ आणि क्रिया प्रक्रिया यांचा देखील विचार शास्त्रज्ञांनी केला आहे. आपण इतक्या खोलात जावयास नको. आपण इतकेच समजुयात की महाविस्फोट झाला आणि ब्रह्मांड निर्माण झाले. मग ते विस्तार पावु लागले.त्यातुन ता-यांची निर्मिती झाली, दीर्घिकांची निर्मिती झाली. आपली आकाशगंगा (दुग्धमेखला) ही देखील एक दीर्घिकाच आहे. त्या दीर्घिकांमध्ये अजुन तारे, ता-यांभोवती ग्रह, ग्रहांभोवती उपग्रह तयार झाले. नवनवीन खगोल पिंड बनण्याची क्रिया अजुनदेखील सुरुच आहे. जस आपण वर समजुन घेतलं की प्रत्येक खगोल पिंड कधी ना कधी बनतो म्हणजे त्याचा जन्म होतो. तो कधी बनला आहे , त्याचे वय किती असावे हे शोधुन काढण्यासाठीची निरीक्षणांवर आधारलेली गणिते मांडली जातात. म्हणजेच काय प्रत्येक पिंडाचे वय असते, जसे आपले असते ना, अगदी तसेच. तर जेम्स वेब च्या माध्यमातुन शास्त्रज्ञांना ब्रह्मांडाच्या उत्पतीच्या वेळी जन्माला आलेले खगोल पिंड पहायचे असल्याने जेम्स वेबचा आरसा विशिष्ट मोजमापाचा बनविला गेला.

जेम्स वेब हा एक स्पेस टेलीस्कोप आहे म्हणजे तो देखील हबल प्रमाणेच अंररिक्षात आहे. पण नेमका कुठे?

सुर्याभोवती अश्या पाच पोकळ्या आहेत जिथे सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत नाही. या पोकळ्या अश्यादेखील आहेत की इथे अन्य कोणत्याही ग्रहांच्या गुर्त्वाकर्षणाचा परिणाम होत नाही. म्हणजे या पोकळीमध्ये जर एखादी वस्तु स्थापित झाली तर ती त्याच पोकळीत राहील पण जेम्स वेब सुर्याभोवती मात्र भ्रमण करीत राहील. पृथ्वीपासुन जेम्स वेब चे अंतर 15 लाख किमी इतके आहे. या पाच ज्या पोकळ्या आहेत, किंवा जागा आहेत त्यांना लॅग्रांज पॉंईंट्स म्हणतात. त्यातील दुसया म्हणजे एल 1 या  लॅग्रांज पॉईंट वर जेम्स वेब आहे.

आता तुम्हाला पुढील माहिती वाचुन आनंद आणि आश्चर्य दोन्ही होईल. भारताचे आदित्य या मोहिमेचे, यानाचे नाव आदित्य एल 1 असे आहे. एल 1 चा अर्थ आता तुम्हाला आता समजला असेल. आपले आदित्य यान देखील लॅग्रांज पॉईंटवर जाणार आहे, तितकेच म्हणजे 15 लाख किमी दुर असणार आहे पृथ्वीपासुन.

या लेखातील माहिती, आकडेवारी ध्यानात ठेवा, पुढील काही लेखांमध्ये आपणास अंतरिक्षाच्या अजुनही जटील संकल्पना समजुन घेण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे.

कळावे

आपला 
हेमंत ववले

Our Recent Video

गेली काही वर्षे आपण निसर्गशाळा येथे आपला जमिनीचा एक तुकडा पर्यावरण दृष्ट्या समृध्द करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. झाडं लावणे, त्यांची निगा राखणे, संरक्षण करणे अश्या अनेक गोष्टी या प्रयत्नांचा भाग आहे. मागील काही महिन्यांमध्ये आम्हाला येथील झाडं झुडपांच्या वाढी मध्ये बदल झालेला जाणवला.. नक्की मागील काही महिन्यांत काय बदल झाला की ज्यामुळे झाडा-झुडूपांची वाढ चांगली झालेली आपणास दिसते हे जाणुन घेण्यासाठी हा व्हिडीयो अवश्य पहा.

Our stargazing Calendar for coming season

Explore

Our Upcoming events

02 March 2024
March 2 - March 3
Nisargshala Velhe, nisargshala
Velhe, Maharashtra 412221 India

Its time to dust off your binoculars and telescopes. We have clear night sky now. And this is the just the right time to star gaze. We are organizing Star […]

09 March 2024
March 9 - March 10
Nisargshala Velhe, nisargshala
Velhe, Maharashtra 412221 India

Its time to dust off your binoculars and telescopes. We have clear night sky now. And this is the just the right time to star gaze. We are organizing Star […]

06 April 2024
April 6 - April 7
Nisargshala Velhe, nisargshala
Velhe, Maharashtra 412221 India

Its time to dust off your binoculars and telescopes. We have clear night sky now. And this is the just the right time to star gaze. We are organizing Star […]

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]