वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

waterfall rappelling near Pune

तरुण, उत्साही पर्यटक

प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सरअह करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण कॅम्पिंगचा अनुभव तसा पहिलाच. पहिल्या दिवशी संध्याकाळी साइटवर येताना ते अक्षरशः चिंब भिजुनच आले होते. निसर्गशाळेपर्यंत पोहोचणे सुध्दा धाडसाचे आणि निसर्गाच्या अलौकिक चमत्कारांच्या गराड्यातुन येण्यासारखे आहे. त्यातही पावसाळ्यात निसर्गशाळेला पोहोचणे म्हणजे तर एक अफलातुन अनुभव. धुक्यासारख्या भासणा-या ढगातुनच आपली गाडी चालत असते. त्यात धोधो पडणारा पाऊस.

 

 

View this post on Instagram

 

This is how it rains @ nisargshala

A post shared by Nisargshala (@nisargshala) on

 

स्वागत आणि निसर्गशाळेची स्पेशालिटी

आमचेकडे कुणाचे येणे नक्की झाले की आम्ही त्यांना सविस्तर आणि अचुक अशी सगळी माहिती देतो. जसे कोणत्या रस्त्याने यायचे, सोबत काय काय आणायचे, काय काळजी घ्यायची, येताना वाटेत काय पाहता येऊ शकते, काय करु नये इत्यादी. साईट वर पोहोचल्याबरोबर, प्रथमेश आणि त्याच्या ग्रुपला त्यांचे टेंट कुठे आहेत ते सांगुन कपडे बदलण्यास सांगितले. कपडे बदलेपर्यंत गरमागरम वाफाळलेला चहा आणि पार्लेजी बिस्कीटे तयारच होती. सगळ्यांनी यथेच्छ चहा बिस्कीट वर ताव मारला. अंधार पडता पडता पोरांनी शेगडी पेटवली. आमचे कडे सर्व कामे स्वःतच करावी लागतात. बार्बेक्यु साठी शेगडी कशी पेटवायची इथुन ते अगदी मॅरीनेशन कसे करायचे, भाजायचे कसे, कोणते तेल वापरायचे हे सर्व आम्ही सर्वांना मुक्तहस्ते सर्व शिकवतो. बदाबदा पाऊस आणि घोंघावणारा वारा, यामुळे शेगडीतील कोळसे लवकर पेटत नव्हते. तरी प्रथमेश आणि गॅंग ने हार न मानता प्रयत्न केले आणि अर्धा तासाने शेगडी पेटवलीच. यावेळी मी या ग्रुपला आख्खी कोंबडी भाजुन खायला दिली. सर्वांना खुप आवडली.

Stuffed whole Chicken

Stuffed whole Chicken

रात्रीचे जेवण उरकुन सगळे जण शेकोटी भोवती बारा वाजेस्तोवर गप्पा मारीत होते. सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही नाश्ता करुन रॅपेलिंगसाठी निघालो. आम्ही जिथे रॅपेलिंग करतो त्या कड्यावरुन पावसाळ्यात खुप मोठा जलप्रपात जमीनीवर कोसळतो. पावसाळ्यात इथे धबधबा तयार होतो. अंदाजे ५० फुट उंचीचा हा धबधबा, तस पाहता फार मोठा नाही. सर्वांना प्रात्यक्षिक दाखवावे लागते. त्यासाठी आमचा एखादा कार्यकर्ता (माझे अनेक मित्र निसर्गशाळेचे कार्यकर्ते आहेत!) सर्वात आधी प्रात्यक्षिक दाखवित कड्यावरुन खाली उतरतो. यावेळी अजित नाईक (www.hydraulicsparesindia.com चा मालक आणि एक यशस्वी उद्योजक) कार्यकर्ता म्हणुन सर्वात आधी खाली उतरला.

रॅपलिंग म्हणजे काय?

रॅपलिंग हा एक धाडसी खेळ आहे. प्रत्येक खेळामध्ये आनंद असतो तसा यातही आहे. तसेच त्या त्या खेळामध्ये काही अनुषांगिक धोके देखील असतात. रॅपलिंग मधला धोका कोणता? तर यामध्ये जर आयोजकांकडुन एखादी चुक झाली तर खेळाडुच्या जीवाला देखील धोका यात होऊ शकतो. रॅपेलिंग करण्यासाठी आमच्या येणारे लोक सर्वच नवीन असतात. त्यामुळे त्यांच्याकडुन चुका होणारच आणि होतात देखील. पण आयोजक म्हणजे आम्ही रॅपेलिंगच्या आधीच सर्व प्रकारे सुरक्षा चाचण्या घेऊनच खेळास सुरुवात करीत असतो. प्रत्येक दोर, प्रत्येक गाठ तीन तीन चार चार वेळा तपासली जाते. या खेळासाठी काही विशेष साधने देखील वापरावी लागतात. त्यांची देखील तपासणी वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे असते. जसे हार्नेस कुठे फाटलेले किंवा उसवलेले तर नाही ना? कॅराबिनर नीट काम करतात ना? त्यांचे स्क्रु फिरत आहेत ना? इत्यादी.

निसर्गशाळेचे प्रशिक्षित आणि अनुभवी मार्गदर्शक

अनेकांना प्रश्न पडतो की हेमंत हे सगळे कुठे शिकला? तसा प्रथमेश ला सुध्दा पडला. त्याने तसे मला विचारले. सर्वांनाच ऐकु जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये मी माझ्या गिर्यारोहनातील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राविषयी माहिती दिली. यशदिप आणि मी दोघांनीही ही या सर्व क्रिडाप्रकारात जगातील सर्वोत्कृष्ट संस्थेकडुन प्रशिक्षण घेतले आहे. त्या संस्थेचे नाव आहे नेहरु इंस्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग, उत्तरकाशी, हिमालय. हे सगळे ऐकल्यावर सर्वांना अजुन जास्त आधार वाटतो. तुम्ही अन्य कुठे ही अशा क्रिडाप्रकारासाठी जरी गेलात तरी लक्षात ठेवा, जे कोणी आयोजक आणि प्रत्यक्ष ॲडव्हेंचर लीडर्स आहेत, त्यांचे प्रशिक्षणाविषयी माहीती जरुर घ्या. भारतात अशा मोजक्याच संस्था आहेत जिथे या सर्व क्रिडाप्रकारांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळते. त्यांची नावे अशी खाली आहेत.

  • नेहरु इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग – ही निम सरकारी संस्था आहे व यातील प्रशिक्षक आर्मी मधील असतात. क्वचित नागरीक देखील यात प्रशिक्षक म्हणुन असु शकतात पण ते निष्णात असावयास ह्वेत तरच त्यांना तशी संधी दिली जाते
  • हिमालयन माऊंटेनीयरींग इन्स्टीट्युट , दार्जीलिंग
  • जवाहर इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड विंटर स्पोर्ट्स, पेहलगाम
  • अटल बिहारी इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड अलाईड स्पोर्ट्स, मनाली

थरार की थरथराट?

Adventure Weekend getaway Camping near Pune. In this package you get all the fun and thrill of camping in real nature near Pune. Our campsite is located in the core of western ghats near Pune. This area is called as Velhe and located towards southwest of Pune city at distance of 70 to 80 kms from Pune.

Adventure Camping near Pune – Dorota Oeiknigh

असो. अजित रॅपलिंग करुन खाली उतरला. त्याच्या मागे आणखी दोन जणांनी रॅपेलिंग केले. रॅपलिंग आणि वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये तस पाहता फरक काहीच नाही. वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये कड्यावरुन जलप्रपात पुर्ण वेगाने आणि ताकतीने खाली पडत असतो. तर नुसत्या रॅपेलिंग मध्ये कडा कोरडा असतो. पाणी नसते. दोन्ही मध्ये, खाली उतरण्याचे कौशल्य तेच असते. जसे दोन्ही पायात आपल्या उंची नुसार विशिष्ट अंतर  ठेवणे जेणे करुन आपला तोल जाणार नाही, गुडघे सरळ ठेवणे जेणे करुन पायावर आणि कमरेवर ताण येणार नाही, इत्यादी. पहिले दोन तीन फुट उतरताना सर्वच जण घाबरतात पण एकदा तंत्र समजले आणि दिलेल्या सुचनांचे नीट पालन केले की मग भीती संपते आणि सुरु होतो निसर्गाच्या रौद्र रुपाशी खेळण्याचा आनंद. हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. यामध्ये सगळ्यात मोठा घटक असतो तो म्हणजे आपल्या भीतीवर , भयावर आपणच मिळवलेला विजय. ज्यावेळी खेळाडुस जीव जाण्याची भीती वाटते तेव्हा जे काही होते मला त्या खेळाडुच्या डोळ्यात बघायला मिळत असते. प्रथमेश ने रॅपेलिंगला सुरुवात केली खरी पण त्याची भीती म्मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. अर्थात ही भीती अनाठायी असते. सर्वांना बजावुन सांगितलेले असते की तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही दोन्ही हात जरी सोडले तरी तुम्ही पडणार नाही. माझ्या हातामध्ये एक सुरक्षा दोरी असते, तसेच खाली जो कार्यकर्ता असतो त्याच्या हातामध्ये देखील सुरक्षा असते. त्यामुळे काळजीचे काहीच कारण नसते. हे सगळे प्रात्यक्षिक सुरु असतानाच सांगितलेले असते, त्यांनी ऐकलेले असते, तरीही भीती वाटतेच. भय हा मानवी स्वभाव आहे. यात गैर किंवा कमीपणा असे काहीच नाही. कठीण प्रसंगी आपले अस्तित्व टिकले पाहीजे, कायम राहिले पाहीजे या मुलभुत सहज प्रवृत्तीतुन निर्माण झालेली एक बिकट, निर्णयक्षमता नसलेली अवस्था म्हणजे भय होय. या अवस्थेमध्ये आपण वर्तमान विसरुन जातो. समोरील संकटच आपल्या बुध्दीचा ताबा घेते आणि आपण काहीही ठरवु शकत नाही. परिस्थीती जसे आपल्याला करायला लावेल तसे आपण करत जातो. तोल जातो, शरीरातील सगळी शक्ती हातामध्ये आपोआप येते, पाय घसरतो, कधीकधी खेळाडु ला वाटते की तो पडला. हे सगळे होत असताना, त्या व्यक्तिच्या चेहरा व डोळे असे काही हालचाली करतात की पाहणाराला (अनेकदा मीच असतो किंवा यशदिप) वाटते की त्या खेळाडु साक्षात मृत्युच समोर पाहिला की काय? भीतीची चरम सीमा म्हणजे खेळाडु हातपाय गाळुन, गलितगात्र होऊन जातो. मी वरुन ज्या काही सुचना देत असतो त्याकडे त्याचे लक्ष नसते. त्याला एकच दिसत असते ते म्ह्णजे ………….   . प्रथमेशच्या डोळ्यामध्ये आणि चेह-यावर त्याने त्या अवस्थे मध्ये जे काही पाहिले त्याचे प्रतिबिंब मी स्पष्ट पाहत होतो.

विजय ही विजय

या अवस्थेमध्ये तो खेळाडु नाना प्रकारे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो. हे नाना प्रकार काही ही कामाचे नसतात. जे तंत्र सांगितलेले असते त्याप्रमाणे कृती केली तरच सुखरुप खाली पोहोचणार आहे, हे अजुन तरी आठवलेले नसते. जीवाच्या आकांताने, सगळ्या धडपडी करुन झाल्यावर, आणि त्यांचा काहीच उपयोग होत नाही असे जाणवल्यावर मग तो शुध्दीवर येतो. एकतर त्याला ते तंत्र आठवते किंवा तो माझ्या सुचनांप्रमाणे कृती करायला सुरुवात करतो. वरील सर्व अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्येच होत असते. असे सर्वांच्याच बाबतीत होते असे नाही. क्वचित असे होत असते. पण भीती सर्वांनाच वाटते. भानावर आल्यावर सांगितलेल्या तंत्राप्रमाणे रॅपेलिंग करायला सुरुवात केल्यावर, सर्वात प्रथम जाणीव होते ती विजयाची. भयावर, भीती वर विजय मिळवल्याची. आणि हा अनुभवच सर्वात विलक्षण आहे. मग खेळाडु सुरुवातीस इंच इंच खाली सरकतो, मग एक पाऊल खाली सरकतो आणि आत्मविश्वास आणखी जास्त वाढलेला असेल असे खालच्या कर्यकर्त्याला दिसले की त्याच्या सुचनेनुसार उड्या मारत (हॉपिंग Hopping) खाली उतरतो.

 

धबधब्याचे पाणी अंगावर घेताना शरीरातील प्रत्येक पेशीचा पुनर्जन्मच होतोय की काय असा अनुभव मला येतो. तसा सर्वांनाच येत असेल. आपल्यातील जडत्व कायमचे निघुन जाते आणि जीवनाकडे, सृष्टीकडे, सहका-यांकडे, मित्र नातेवाईकांकडे बघण्याचा दृष्टीकोनह कायमचा बदलुन जातो. हे जग खुप सुंदर आहे. यातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. धबधब्यामधुन खाली उतरताना खेळाडु आकाशाकडे पाहत असतो. तसाच कड्याला काटकोनामध्ये असतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीस सर्व प्रथम आकाश पडत असते. अंत नसणा-या या आकाशापुढे आपले अस्तित्व ते काय? असा प्रश्न ही अनेकांना पडत असावा. जलप्रपात पाय, गुडघे, मांड्या इथपर्यंत आपल्या शरीरावर आदळत असतो. पोट, छाती, चेहरा, डोके यावर पाण्याचा प्रपात/प्रवाह जरी येत नसला तरी किमान लाडुच्या आकाराचे मोठे मोठे थेंब (यांना थेंब म्हणावे की आणखी काही?) पडत असतात. हा प्रत्येक थेंब जेव्हा प्रपातापसुन मोकळा होतो तेव्हा, त्याचे विभाजन होताना खेळाडुला दिसते. हे जणु मोतीच तुटून एकापासुन अनेक तयार झाल्यासारखे वाटते. त्या प्रत्येक तुटलेल्या थेंबांचे पुन्हा अनेक थेंब होत असतात. धबधब्याच्या पाण्याचा इतका जवळुन अनुभव घेताना, निसर्गाचा वेगळाच साक्षात्कार होत असतो. आपल्या असण्याविषयी खात्री पटल्यावर, खेळाडु या सृष्टीतील प्रत्येक छोट्या गोष्टी कृतज्ञ होण्याची शक्यता खुप जास्त असते. अनेक छोट्या गोष्टी मध्ये मोठा आनंद आहे. प्रत्येक नात्यातील गुंता अशा अनुभुती मुळे संपुन जाण्याची शक्यता देखील खुपच जास्त असते. सुरुवातीला इंच इंच सरकणारा खेळाडु, जेव्हा आत्मविश्वासपुर्वक कड्याच्या पायथ्यापाशी पोहोचतो तेव्हा त्याला वाटत असते की हा कडा आणखी उंच असावयास हवा आणि रॅपेलिंग कधी संपुच नये. आमचा खालचा कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यामध्ये खेळाडु असताना त्याला सुचना देत असतो. कधी तो हॉपिंग करायला सांगतो तर कधी पुर्ण पणे आडवे होऊन उजवा हात सोडुन देऊन, जमीनीला समांतर होऊन धबधब्याचे पाण्या अंगावर घ्यायला सांगतो. मी जर कधी खाली असलो तर दोन्ही पाय गुडघ्यात मुडपुन, प्रत्यक्ष जलप्रपात खांद्यावर घेण्यासाठी बसल्यासारखी अवस्थेमध्ये खेळाडुला करायला सांगतो. पाय गुडघ्यामध्ये मुडपून धबधबा खांद्यावर घेणे मला सर्वात जास्त आवडते.

अजितचा शोध – जाकुझी मसाज

जमिनीला पाय लागुच नये असे खेळाडुस वाटत असतानाच, कडा संपतो आणि खालचा कार्यकर्ता खेळाडुस रॅपेलिंग संपल्याची जाणीव करुन देतो. अजित व्यवस्थित, हात देत सपोर्ट करीत, पाठीवर शाबासकीची थाप मारीत, सर्व सुरक्षा साधने काढुन, ती साधने पुन्हा वर पाठवतो. अंगावरील सर्व साधने काढल्यावर मग अजित सर्व खेळाडुंना जाकुझी मसाज, धबधब्यामध्ये कसा घ्यायला याचे प्रशिक्षण देतो. निसर्गाशी, मृत्युशी (खरतर असे काही नसतेच मुळी) दोन हात करुन जिंकलेला खेळाडु मग पुढचा खेळाडु खाली उतरे पर्यंत जाकुझी मसाजचा आनंद घेतो.

सुरुवात, भीती, पाय घसरणे, गलितगात्र होणे, पुन्हा भानावर येणे, रॅपलिंगचा आनंद घेणे, ते ट्पोरे थेंब, आकाश, ढग, बघणे, बिनधास्त होऊन, जमीनीला समांतर होऊन धबधव्याचे पाणी अंगावर घेणे, हे सारे साधारण चार ते पाच मिनिटांतच होते.

 

भीती जितकी जास्त वाटेल विजयाचा आनंद देखील तितकाच जास्त असेल

 

आलेल्या ग्रुपमधील सर्वांनीच रॅपलिंग केले. पण प्रथमेश ने मात्र रॅपलिंगचा थरार, चरम सीमेपर्यंत अनुभवला. भीती जितकी जास्त वाटेल विजयाचा आनंद देखील तितकाच जास्त असेल. वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार सर्वांनीच अनुभवला. मग आम्ही सर्व साधने आणि दोर घेऊन कॅम्पसाईटवर आलो, दुपारचे जेवण सगळ्यांनी दाबुन हाणले. त्यातच आमच्या इथे जेवणाची अस्सल गावरान चव, आणि झालेली दमछाक यामुळे कुणीही नेहमीपेक्षा जरा जास्तच खातो. त्यामुळे आम्ही देखील दुपारच्या जेवणामध्ये कसलीही कसर करीत नाही.

जेवणानंतर, ही मंडळी निघाली. अगदी दृष्टीक्षेपातुन बाहेर जाईपर्यंत त्यांनी हात हालवत आमचा निरोप घेतला. हे सगळे ऋणानुबंध अगदी निर्व्याज, निरपेक्ष आहेत असे मला वाटते.

निसर्गशाळा जेव्हा पासुन सुरु झाले तेव्हा पासुन, प्रत्येक सहलीमध्ये मी देखील आणखी जास्त समंजस, भावनिक पातळीवर आणखी जास्त शुध्द होत चाललो आहे असा माझा स्वःतच अनुभव आहे. आपण जे काही करतो ते आपण पुर्वी करीत होतो त्यापेक्षा आणखी जास्त चांगले कसे करता येईल, स्वःत मधील आणखी प्रगत, शुध्द “मी” कसा अभिव्यक्त होईल यासाठी सतत प्रयत्न करणे मला निसर्गशाळेने शिकवले.

असो. धबधब्यासोबत रॅपलिंगचा थरार तुम्हाला कसा वाटला ते अवश्य सांगा.

Facebook Comments

Share this if you like it..