संपुर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव – हा खेळ सावल्यांचा
क्षितिजापासुन अंदाजे दोन-एक हात, चंद्र वर आकाशामध्ये होता आता. अगदी पुर्ण चंद्र होता. पोर्णिमेचा चंद्र होता. पण आकाशात सत्ता होती अंधाराची. इतका वेळ रक्त वर्णी चंद्राकडे पाहण्याच्या नादात आकाशात लक्षच गेले नव्हते. सहजच मान अवघडी म्हणुन वळवायला गेलो तर आकाशात अमावस्येच्या रात्री दिसते तसे तारांगण, अगदी तारे-तारकापुंजांनी खच्च भरलेले दिसत होते. हा देखील एक दुर्मिळ देखावा होता. एकीकडे पोर्णिमेचा पुर्ण चंद्र दिसतोय तर त्याच्या अगदी शेजारी आणि सर्वदुर तारे लख्ख चमचम करताना पाहणे म्हणजे दुधात साखर होय.
Read More →