Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.
नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे.
सुर्यसिद्धांत या खगोलीय ग्रंथामध्ये ब्रह्महृद्याबाबतील खालील श्लोक येतो. हुतभुग्ब्रह्महृद्यौ वृषे द्वाविंंशभागगौ ॥ अष्टाभिः त्रिंशता चैव विक्षिप्तावुत्तरेण तौ । सुर्य सिध्दांत हे पुस्तक १२००० वर्षांपुर्वी लिहिलेले आहे. ब्रह्महृद्य या ता-याची चित्तरकथा वाचण्यासाठी लिंक करा..
A very wonderful astronomical event is on its way this week. This is the Full moon of Chaitra month of Indian Calender. We call it, Chaitra Poornima.
क्षितिजापासुन अंदाजे दोन-एक हात, चंद्र वर आकाशामध्ये होता आता. अगदी पुर्ण चंद्र होता. पोर्णिमेचा चंद्र होता. पण आकाशात सत्ता होती अंधाराची. इतका वेळ रक्त वर्णी चंद्राकडे पाहण्याच्या नादात आकाशात लक्षच गेले नव्हते. सहजच मान अवघडी म्हणुन वळवायला गेलो तर आकाशात अमावस्येच्या रात्री दिसते तसे तारांगण, अगदी तारे-तारकापुंजांनी खच्च भरलेले दिसत होते. हा देखील एक दुर्मिळ देखावा होता. एकीकडे पोर्णिमेचा पुर्ण चंद्र दिसतोय तर त्याच्या अगदी शेजारी आणि सर्वदुर तारे लख्ख चमचम करताना पाहणे म्हणजे दुधात साखर होय.
हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]