संगीत समाधी @ निसर्गशाळा

संगीत समाधी @ निसर्गशाळा

भारतीय योगशास्त्रामधील तीन अत्यंत अदभुत ग्रंथ म्हणजे पातंजल योगसुत्रे, विज्ञान भैरव आणि विरुपाक्षपंचाशिका. यातील विज्ञान भैरव या ग्रथास शिवविज्ञानोपनिषद असे ही म्हंटले जाते. याच ग्रंथामध्ये संगीतास समाधी पर्यंत पोहोचवणारा एक परिणामकारक मार्ग असे सांगितले आहे. संगीत गाणारा, वाद्य वाजविणारा आणि ऐकणारा अश्या सर्वांनाच परमोच्च आनंदाची प्राप्ती करुन देण्याची क्षमता संगीतामध्ये आहे.

खळखळ वाहणारे पाणी, इकडून तिकडे, एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेपवत किलकिलाट करणारे पक्षी, झाडांच्या पानांमधून सरसर वाट काढीत पुढे पुढे जाणारा वारा तर कधी एखाद्या सुकलेल्या पोकळ बांबुला किट लागून तयार झालेल्या छिद्रातुन आरपार जात शीळ घालणारी हवेची झुळूक.. हे सारे संगीतच तर आहे. 

आम्ही आपले स्वागत करण्यास उत्सुक आहोत निसर्गशाळेच्या आणखी एका स्वर्गीय संगीत रजनी मध्ये उस्फुर्त संगीताच्या  मधुर सुरांद्वारे संगीत समाधीचा अनुभव घेण्यासाठी.

संगीत ऐकणे ही देखील एक साधना आहे आणि यातील विशेष गम्मत म्हणजे ही साधना शिकण्यासाठी कुठल्याही ग्रंथाचा, उपासना पध्दतीचा, विधीचा अवलंब करण्याची अजिबात गरज नाही. संगीत ऐकत ऐकत तुम्ही ही साधना करीत असता. यासाठी कोणत्याही गुरुकडे जाण्याची गरज नाही. हो पण अर्थातच योग्य , दर्जेदार , अधिकारी संगीतकाराची मात्र आवश्यकता असतेच. संगीत निर्माण करणारा अभ्यासपुर्वक, गुरुपरपरेतुन, कष्टातुन, सरावातुन तयार झालेला निष्णात असेल व तुम्हाला संगीत ऐकण्याचे अंतर्मनातील कान असतील तर गाणारा, वाजवणारा आणि ऐकणारा या तिघांतील भेद विरुन जाऊन हे तीघेही एकच होतात. यालाच संगीत समाधी म्हणतात. वरकरणी या अवस्थेमध्ये विविध आवाज जरी उत्पन्न होऊन कल्लोळ झालेला ति-हाईताला दिसत असला तरी या तिघांच्याही अंतर्यामी तादात्म्य भावाचा विकास होऊन भावनिक स्थिरता प्राप्त झालेली असते. 

संगीत समाधी प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे? 

भारतीय परंपरा म्हणते संगीत समाधीप्रत पोहोचण्यासाठी तुम्ही एकतर संगीतकार व्हा, योग्य , अधिकारी, परंपरेतुन शिकलेल्या, सिध्द झालेल्या गुरुकडुन संगीत शिक्षा प्राप्त करुन घ्या. आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही संगीत ऐका. 

दुसरा जो मार्ग आहे तो अगदीच सोपा व कुणालाही सहज साध्य आहे. भारतीय परंपरा सांगते की संगीत तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या बुध्दीला अक्षरशः बाजुला ठेवा. म्हणजे तुम्ही असे समजा तुम्हाला योग्य-अयोग्य ठरवणारी बुध्दी, मस्तिष्कच नाहीये. आणि तुम्ही जे स्वर ऐकत आहात ते थेट ह्रुद्याला भिडत आहेत. बाह्येंद्रीय असलेले कान जरी असले ऐकण्याचे काम आपल्या ह्रुद्यातील अंतर्यामीचे कान करताहेत. आपली सगळी इंद्रियांची जोडणी मेंदुला नसुन आपल्या ह्रुद्याला, भावविभोर मनाला झालेली आहे असाही अनुभव घ्या. गायक, वादक, श्रोता, स्वर, नाद हे सारेच्या एकमेकांत इतके मिसळुन जाते की त्या तंद्रीमध्ये हे सारे वरकरणी वेगवेगळे आहेत याचा विसर बुध्दीस पडतो किंबहुना हा भेद करणारी बुध्दी देखील नाद-स्वरांशी तादात्म्य पावते. भेद नसतो. असते केवळ एकच ब्रह्म, अभेद्य, ब्रह्म, अरुप ब्रह्म, अद्वीतीय बह्र्म, एमकेव ब्रह्म म्हणजे नाद-ब्रह्म !

समाधी अवस्था प्राप्त होत नाही तोवर काय?

संगीत साधनेसारखी अन्य साधनाच नाहीये इथे. या साधनेत साधना करतानाच तुम्हाला आनंदाचा अनुभव होत असतो. इतर कोणतीही साधना असली तरी त्यात साधकास यम-नियम आदींद्वारे शरीर-मन-बुध्दी-अहंकारास नियंत्रीत करावे लागते. प्रसंगी हे करताना वेदना, यातना सहन कराव्या लागतात. पण संगीत साधनाच एकमेव अशी साधना आहे की ज्यात वेदना, यातना, दुःख, क्लेश, उपास-तापास काही म्हणजे काही नाही. साधनेच्या प्रत्येक पायरीवर आहे केवळ आनंद. कित्येक वेळा संगीत ऐकताना एखादा मनुष्य इतका तल्लिन होतो की त्याला अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटतात. डोळ्यांत आनंदाश्रु येतात, शरीर जागेवरच असले तरी सुक्ष्म शरीर अक्षरशः नाद-ब्रह्माच्या तालावर, लयीवर नाचत आहे असा अनुभव येतो. पहा म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होत नाही तोवर देखील इथे आनंदाची डोही आणि आनंदच तरंग आहेत.

संगीत समाधी ती देखील निसर्गाच्या कुशीत कशी असेल बरे?

संगीत ऐकण्याच्या या साधनेसाठी , आनंद रोम-रोमामध्ये भारुन घेण्यासाठी, भाव-विभोर होण्यासाठी, नाद-ब्रह्माच्या प्राप्तीसाठी कोलाहलापासुन दुर, प्रदुषणापासुन दुर, नितांत सुंदर डोंगर-द-यांमध्ये, एखाद्या नदीच्या काठावर, फोन-मोबाईल-सोशल मीडीया आदी सर्वांपासुन दुर, उबदार थंडीच्या दुलईखाली आपण निसर्गशाळेत संगीत रजनी चे आयोजन करीत असतो. तुम्हाला देखील आवडेल ना या साधनेचा व समाधीचा अनुभव घ्यायला?

चला तर मग भेटुयात निसर्गशाळेत, अश्या अभुतपुर्व संगीत रजनी साठी.

तोपर्यंत कळावे 

आपला

हेमंत ववले,

निसर्गशाळा, पुणे

The Program

This is going to be a residential program @ nisargshala. The performance is organised in the lap of mother nature, an area where there absolute zero pollution of any sort be it sound pollution, light pollution or air pollution.

What is it?

Conquering Moods Under a million stars

We at nisargshala, have been organizing Music concerts @ nisargshala. Such is the very first initiative for artists to perform in real unspoilt nature as well as for audiences to listen to best of music compositions that too in real nature, away from hustle and bustle of modern humans entangled life. People find serenity here, they can feel the bond between them and mother nature.

Yash Soman, a very enthusiastic music composer, creator, innovator had been once at nisargshala. He stood at the platform, from where people see sky full of stars with naked eyes. At that time, he struck with the idea of playing, composing, creating music under the stars on the platform.
This is going to be unique and for the first time, kind of Music concert, off course with limited audiences , in which the artists would perform without any fixed flow or any preplan in mind. The impromptu music, the tri, Yash Soman, Santosh Naik and Chandrakant Chitte would be creating , is going to be an absolute innovation in Music world.
This would help motivate young artists at the same time such events would help people realise that Music certainly has the ability to make human mind feel absolute bliss, when played by experts.

This program has got another very shining, shimmering aspect. The artists would perform under the stars, on a platform which is open to sky.
Event iterenary is as follows
1. Reach nisargshala Camp
2. High tea and some snacks
3. Stargazing through telescope as it starts getting dark.
4. Music concert to start by 07:00 pm
5. A break around at 08:15 pm
6. Next session of Music concert @ 08:30 pm
7. Dinner @ 09:30 pm
8. Stargazing resumes around 10:30 pm
9. Guided Cosmic Meditation with Heavenly divine music @ 11:00 pm
10. Calling the day OFF by 11:40 pm
11. Morning Nature Trail @ 07:00 am
12. Next morning – Breakfast around 08:30 am
12. Head back to Pune by 10:00 am

The highlights

तबला सोबत अनेक वाद्ये

YASH SOMAN - A self-motivated artist performed numerous Tabla Solos. Accompanied Indian classical vocalists, instrumentalists and kathak dancers. Performed in Orchestra shows featuring Hindi, Marathi and Bengali Songs. On stage performances of Bhajan, Natyasangeet, Ghazal concerts and fusion concerts. He is working as a sound recordist in SUR Recording Studios & Video Production

Santosh Naik - बासरी

Disciple of Pt. Sameer Rao 13 years of experience in Indian classical music, with a mastery on keyskills in Flute. Performed on various renowned national and international platforms. Guest Faculty for Music Dept. MIT Vishwashanti Gurukul, Loni, Pune Musical Qualification ICCF CERTIFICATE HOLDER | 2014 Passed Hindustani Junior grade examination | 2010 Gandharva Mahavidyalay Certificate Holder | 2009

चंद्रकांत संजयराव चित्ते

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधुन संगीतामधे हार्मोनियम या वाद्यामधे एम ए झाले. प्राथमिक शिक्षण सौ. संगीता चाटी यांच्या कडे झाले, पुढे हार्मोनियम चे शिक्षण पं. प्रमोद मराठे सरांकडे दोन वर्षे घेतले व आत्ता श्री. मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे हार्मोनियमचे शिक्षण चालू आहे व त्याच प्रकारे तालाचे शिक्षण घेण्यासाठी पं. रामदास पळसुले यांचेही मार्गदर्शन घेत आहे. १. सीसीआरटी शिष्यवृत्ती प्राप्त. २. गांधर्व महाविद्यालयाची शिष्यवर्ती प्राप्त. २. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून व रवींद्र संगीत पुरस्कार.

ध्वनी व्यवस्था - श्री राजु कांबळे

राजूभाई गेली २३ वर्षे अविरतपणे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ऊत्सव समिती साठी ध्वनी व्यवस्थापन पहात आहेत. त्याच बरोबरीने पं. हरीप्रसाद चौरासिया, ऊ. झाकीर हुसेन, आरतीताई अंकलीकर, शौनक अभिषेकी ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभलेले राजूभाई अनेक संगीत कार्यक्रमात कलाकार आणि साथीचा वाद्यवृंद ह्यांच्या स्वर-सुभाषितांचा सुरमिश्रित दरवळ अचुकपणे श्रोत्यांपर्यंत पोचवतात.

आकाशदर्शन

आपण या महान अशा, विस्तीर्ण अशा, आदी अंत नसलेल्या, सदैव गतिमान असणा-या, सदैव परिवर्तनशील असणा-या, तरीही सदैव वर्तमान असणा-या, लाखो करोडो तारे तारकांनी भरलेल्या अंतरीक्षाचा, महान विश्वाचा आपण एक अगदी छोटा, क्षुल्लक असा, अनुल्लेखणीय असा, काहीही महत्व नसलेला असा अगदी छोटा भाग म्हणजे केवळ एका धुळीच्या कणाइतकेही आपले अस्तित्व क्षुल्लक आहे असे आपणास समजते ते केवळ आकाशदर्शनामुळे. आपले क्षुल्लक असणे समजले तरीही आपणास आनंद होतो ही किमया आहे आकाशदर्शनाची. विश्वाच्या जटील कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी बुध्दी मारे उड्या मारते, काय असेल, कसे असेल, कशी सुरुवात झाली असेल, कधी कसा कुठे शेवट होईल, शेवट होईल की नाही, काय होईल, असे होईल की तसे होईल..असे अनेक प्रश्न डोक्यात येऊ लागतात, त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी धडपड केली जाते, विचारांचा अगदी हलकल्लोळ होतो, काहुर माजते डोक्यात..पण गम्मत याची इतकी न्यारी की हा हलकल्लोळ देखील आपणास अनामिक शांततेचा अनुभव देत असतो.

Registration Fees - 1500 Rs per person, including Music Concert, Stay @ nisargshala, dinner & Breakfast

Registration Form

Please select संगीत रजनी @ निसर्गशाळा while selecting package

eyJpZCI6IjkiLCJsYWJlbCI6IkNvbnRhY3QgdXMiLCJhY3RpdmUiOiIxIiwib3JpZ2luYWxfaWQiOiIxIiwidW5pcXVlX2lkIjoid2VmajIiLCJwYXJhbXMiOnsiZW5hYmxlRm9yTWVtYmVyc2hpcCI6IjAiLCJ0cGwiOnsid2lkdGgiOiIxMDAiLCJ3aWR0aF9tZWFzdXJlIjoiJSIsImJnX3R5cGVfMCI6Im5vbmUiLCJiZ19pbWdfMCI6IiIsImJnX2NvbG9yXzAiOiIjODFkNzQyIiwiYmdfdHlwZV8xIjoiY29sb3IiLCJiZ19pbWdfMSI6IiIsImJnX2NvbG9yXzEiOiIjMzMzMzMzIiwiYmdfdHlwZV8yIjoiY29sb3IiLCJiZ19pbWdfMiI6IiIsImJnX2NvbG9yXzIiOiIjMzMzMzMzIiwiYmdfdHlwZV8zIjoiY29sb3IiLCJiZ19pbWdfMyI6IiIsImJnX2NvbG9yXzMiOiIjMzMzMzMzIiwiZmllbGRfZXJyb3JfaW52YWxpZCI6IiIsImZvcm1fc2VudF9tc2ciOiJUaGFuayB5b3UgZm9yIGJvb2tpbmcgdGhlIGJvb2tpbmcgcmVxdWVzdC4gWW91ciBib29raW5nIHdvdWxkIGJlIGNvbmZpcm1lZCBvbmNlIHlvdSBtYWtlIHRoZSBwYXltZW50LiIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjMDAwMDAwIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwiZW1haWxfZm9ybV9kYXRhX2FzX3RibCI6IjEiLCJ0ZXN0X2VtYWlsIjoiaGVtYW50dmF2YWxlQGdtYWlsLmNvbSIsInNhdmVfY29udGFjdHMiOiIxIiwiZXhwX2RlbGltIjoiOyIsImZiX2NvbnZlcnRfYmFzZSI6IiIsImZpZWxkX3dyYXBwZXIiOiI8ZGl2IFtmaWVsZF9zaGVsbF9jbGFzc2VzXSBbZmllbGRfc2hlbGxfc3R5bGVzXT5bZmllbGRdPFwvZGl2PiJ9LCJmaWVsZHMiOlt7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiZmlyc3RfbmFtZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJGdWxsIE5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFbWFpbCIsImxhYmVsIjoiTW9iaWxlIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJXaGF0c2FwcCBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJkYXRlIiwibGFiZWwiOiJTZWxlY3QgZGF0ZSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRGF0ZSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6ImRhdGUiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiUGFydGljaXBhbnRzIiwibGFiZWwiOiJQbGVhc2UgZW50ZXIgbnVtYmVyIG9mIHBlb3BsZSIsInBsYWNlaG9sZGVyIjoicGVvcGxlIiwidmFsdWUiOiI1IiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY291bnQiLCJsYWJlbCI6IlZlZ1wvTm9uLVZlZyBjb3VudCIsInBsYWNlaG9sZGVyIjoiVmVnXC9Ob24tVmVnIGNvdW50IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiRGF0ZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJOYW1lcyBhbmQgYWdlcyBvZiBhbGwgcGFydGljaXBhbnRzIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dGFyZWEiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjEyIiwibmFtZSI6InBhY2thZ2UiLCJsYWJlbCI6IkNob29zZSB5b3VyIHBhY2thZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3Rib3giLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibGFiZWxfZGVsaW0iOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIiLCJvcHRpb25zIjpbeyJuYW1lIjoiTk5SIiwibGFiZWwiOiJPdmVybmlnaHQgQ2FtcCJ9LHsibmFtZSI6Ik5OUkFBIiwibGFiZWwiOiJPdmVybmlnaHQgQ2FtcCArIEFkdmVudHVyZSBBRERPTiJ9LHsibmFtZSI6IlRSZWtjYW1wIiwibGFiZWwiOiJPbmUgZGF5IFRyZWtraW5nIn0seyJuYW1lIjoiU3RhclBhcnR5IiwibGFiZWwiOiJTdGFyIFBhcnR5ICh3aXRob3V0IGZvb2QgJmFtcDsgU3RheSkifSx7Im5hbWUiOiJiaGlnd2FuIiwibGFiZWwiOiJCaXJkIFdhdGNoaW5nIEAgQmhpZ3dhbiJ9LHsibmFtZSI6InNhbmdlZXRyYWphbmkiLCJsYWJlbCI6Ilx1MDkzOFx1MDkwMlx1MDkxN1x1MDk0MFx1MDkyNCBcdTA5MzBcdTA5MWNcdTA5MjhcdTA5NDAgQCBcdTA5MjhcdTA5M2ZcdTA5MzhcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MTdcdTA5MzZcdTA5M2VcdTA5MzNcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJ3ZWVrZGF5Y2FtcCIsImxhYmVsIjoiUGVhY2VmdWwgV2Vla2RheSBDYW1wIFN0YXkifV19LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6InNlbmQiLCJsYWJlbCI6IlNlbmQiLCJodG1sIjoic3VibWl0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJyZXNldCIsImxhYmVsIjoiUmVzZXQiLCJodG1sIjoicmVzZXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiJ9XSwib3B0c19hdHRycyI6eyJiZ19udW1iZXIiOiI0In19LCJpbWdfcHJldmlldyI6ImJhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3cyI6IjQ5MzM2IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMzAwOTkiLCJhY3Rpb25zIjoiMTA5MiIsInNvcnRfb3JkZXIiOiIwIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvd3d3Lm5pc2FyZ3NoYWxhLmluXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiOV83MTI5MjkiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfOV83MTI5MjkiLCJjb25uZWN0X2hhc2giOiIyMjlhMjU0NzBjNTBmN2EwMzE1NTU3MWYwNTcyZjkxNyJ9

Registration Fee

Music Concert in Nature - 1500 Rs per person

Please use 9049002053 (upi id – hemantvavale-2@okhdfcbank) number to google pay fees. When you enter the number in google pay please select Hemant Vavale account. or Scan following QR code

Bank Account Details

Name – Nisargshala

Account Number – 50200033792832

IFSC – HDFC0002493

Branch Pirangut/Kasaramboli

Share this if you like it..