ब्रम्हांडाचा पसारा किती असेल?

आकाशगंगा

The Milky Way arching at a high inclination across the night sky (fish-eye mosaic shot at Paranal, Chile). The bright object is Jupiter in the constellation Sagittarius, and the Magellanic Clouds can be seen on the left. Galactic north is downwards.

काही ठोकताळे/तथ्ये सुरुवातीस –

 • सुर्यापासुन निघालेला एक प्रकाश किरण एका सेकंदामध्ये अंदाजे ३ लाख किमी चा प्रवास करतो.
 • ह्याच वेगाने प्रकाशकिरण एका वर्षात जितके अंतर प्रवास करेल त्यास एक प्रकाश वर्ष म्हणतात.
 • म्हणजेच एका प्रकाश वर्षाचे अंदाजे अंतर किती ? – ९४,६३,००,००,००,००० किमी
 • सुर्य व पृथ्वीमधील अंतर – ८ प्रकाश मिनिटे आणि१८ प्रकाश सेकंद
 • आकाशातील सर्वात जवळचा तारा पृथ्वीपासुन किती अंतरावर आहे – ४.३ प्रकाशवर्षे, म्हणजे ९४,६३,००,००,००,००० या संख्येला ४.३ ने गुणले तर जे उत्तर येईल तेवढ्या अंतरावर हा तारा आहे. शास्र्तज्ञांनी या ता-या ला प्रॉक्सिमा सेंटॉरी असे नाव दिले आहे.
आता खरी गंमत सुरु होते. आपण रात्रीच्या वेळी जे काही तारे पाहतो, त्यात काही लख्ख प्रकाशमान असतात तर काही मंद फिकट म्हणजे त्यांचा प्रकाश अगदीच क्षीण असतो. आपल्या डोळ्याना हे जे काही तारांगण दिसते त्या तारांगणामध्ये आपल्या सर्वात जवळचा प्रोक्सिमा सेंटोरी तारा नसतो. तो इतका क्षीण मंद आहे की तो नुसत्त्या डोळ्यांना दिसतच नाही.
आता दुसरे उदाहरण पाहु. आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रात्रीच्या आकाशात, मृगनक्षत्र नक्कीच पाहीलेले असते. या मृगनक्षत्रामध्ये आपणास चार तेजस्वी तारे दिसतात. या चार ता-यांस आपण मृगाचे शरीर म्हणतो. या ता-यांमधील सर्वात तेजस्वी दिसणारा तारा पृथ्वीपासुन २००० प्रकाशवर्ष इतका दुर आहे.

या वरुन आपणास अंदाज येऊ शकेल की आपल्या डोळ्यांना दिसणा-या हे तारे आणि तारकापुंज किती दुर आहेत. व जो सर्वात जास्त जवळ आहे तो डोळ्यांना दिसत देखील नाही. मृग नक्षत्रातील हे दुर वरचे, प्रकाशमान तारे पृथ्वीवरुन नुसत्या डोळ्यांना दिसतात व प्रॉक्सिमा दिसत नाही, यावरुन हे लक्षात येते की हे स्वयंप्रकाशित तारे किती मोठ्या प्रमाणात प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करीत असतील.

या व्यतिरीक्त आणखीही काही तथ्ये आपणास माहीत असणे आवश्यक आहेत. पहीले म्हणजे आपल्या  सुर्यापेक्षा हे मृगनक्षत्रातील तारे किमान ३०० पटीने मोठे आहेत. याचाच अर्थ असा होतो की कदाचित मृगनक्षत्रातील या ता-यापैकी एखाद्या ता-यावरुन जर आपण आपला सुर्य पाहायचा म्हंटले तर व ते तसे तिथपर्यंत पोहोचता आले तर, आपला सुर्य तिथुन दिसणार नाही, कारण सुर्य आकाशगंगेतील इतर ता-यांच्या तुलनेत छोटा आहे.

A photograph of galaxy UGC 12158, which is thought to resemble the Milky Way in appearance.

A photograph of galaxy UGC 12158, which is thought to resemble the Milky Way in appearance.

या सर्वांवरुन आपणास हे लक्षात येते की ब्रम्हांडाचा विस्तार खुप मोठा आहे. या सा-या मध्ये एक विशिष्ट योजना आहे. तारतम्य आहे. कमी अधिक काही नाही. आकाशस्थ ग्रहगोलांमध्ये, ता-यांमध्ये , तारकापुंजांमध्ये परस्पर आकर्षण-विकर्षण इतकेच आहे की त्यामुळे हे ब्रम्हांड गतिमान असुन देखील योजनाबध्द रीतीने सुरक्षित आहे.

शास्त्रज्ञांना अजुनही आपल्या सौर मंडलाच्या बाहेर मनुष्य किंवा यंत्र यांना पाठविता आलेले नाही. हबल किंवा तत्सम दुर्बिणींच्या साहाय्याने जे काही दिसते आहे त्यावरुनच ब्रम्हांडाचे सध्या चे मानचिन्ह तयार झाले आहे.

आपली आकाशगंगा ही एक गॅलक्सी आहे व अशा अनेक (अब्जाबधी) गॅलक्सी अंतरीक्षामध्ये असण्याची शक्यता आहे. तर विचार करा की ह्या ब्रम्हांडाचा पसारा किती असेल?

हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

 

Upcoming.

Star gazing Party near Pune

December 4th , 2021

Facebook Comments

Share this if you like it..

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]