एक दोन दिवसांपासुन समाधानकारक पाऊस सुरु झालेला दिसतोय पुणे परिसरामध्ये. आपल्या कॅम्पसाईट परिसरामध्ये तर या आधीच मस्त पाऊस सुरु झालाय. ओढे, नद्या, नाले खळखळ वाहु लागले आहेत. आणि असेच मोहीत करणारे, हिरवे हिरवेगार गालिचे पुणे परिसरामध्ये लवकरच दिसतील. आपल्या सर्वांनाच ज्या पावसाची प्रतिक्षा होती तो झालाच सुरु एकदाचा.
पण पाऊस कधी सुरु होईल, होईल की नाही होईल यावर्षी पाऊस, पुरेसा पाऊस पडेल की नाही अशा अनेक चिंतांनी आपण सारेच ग्रासलेलो होतो. इतके की सोशल मीडीयावर पाऊसाचे तुलना वाट पहायला लावणा-या प्रियसी सोबत केल्याचे मेमेज अगदी भरभरुन व्हायरल झाले.
पाऊस कुणाला नकोय बरे? सर्वांनाच पाऊस हवाय. पण तो पाऊस योग्य पध्दतीने पडण्यासाठी आपणाकडे जसे पर्यावरण हवे, जसे पुर्वी होते तसे आता राहिले नाही. काही मोजकेच पर्यावरण प्रेमी लोक नाना प्रकारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करताहेत. अशा लोकांसाठी पाऊस म्हणजे संजीवनीच आहे. व हौशे-नवशे-गवशे देखील पावसाची वाट पाहतातच की. एकदाका पाऊस सुरु झाला की मग यांना घाटामाथ्यावर म्हणजे मुळशी, मावळ, वेल्हा, भोर अशा मावळ भागात जाऊन मद्यधुंद व्हायचे असते. धांगडधिंगाणा करायचा असतो. तर काहींना नुकत्याच हिरव्यागार झालेल्या एखाद्या डोंगरासोबत सेल्फी काढायचा असतो. असणारच असे लोक देखील. पण यांना पावसाच्या येण्याशी किंवा न येण्याशी फार काही देणे घेणे नसते. असो
तर ज्या लोकांना मुळातच निसर्गाची आवड आहे, निसर्गात रमायला ज्यांना आवडते, जे निसर्गात आपोआपच रममाण होतात, मंत्रमुग्ध होतात अशा लोकांना पाऊस कधी सुरु होईल, सुरु झाला तर खुप जास्त होईल की, मध्यम होईल की खुप कमी पाऊस होईल की दुष्काळच पडेल अशा प्रश्नांची उत्तरे आधीच मिळाली तर?
तुम्ही म्हणाल की यासाठी हवामान खाते आहे की, त्यांचा अंदाज वाचला की कळेल आपणास सर्व! पण हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबुन राहणे म्हणजे पुर्वतयारी साठी वेळ न मिळण्यासारखे आहे. हवामान खात्यास देखील पावसाचे पुर्वानुमान अचुक सांगणे अद्याप जमले नाही. मग कसे काय कळणार बरे पावसाचा अंदाज?
यासाठी या व्हिडीयोमध्ये, मारुती चितमपल्ली यांचे निसर्गाचे हवामान खाते अवश्य पहा. अंदाजे १५ मिनिटांचा व्हिडीयो आहे, त्यामुळे एकाच बैठकीत पाहता येईल अशी वेळ निवडुन आठवणीने पहा ऐका मारुती चितमपल्ली यांना!
वा…छान च