मंगळावरील धुळीचे लोट

Mar's dust storms

मंगळ जर कुणाच्या कुंडली मध्ये बसला/असला तर त्याचे/तिचे चांगलेच बॅंड वाजवतो. आत्ता म्हणजे सध्या, आपल्या पृथ्वीवरील जुन २०१८ च्या महिन्यामध्ये, खुद्द मंगळालाच धुळीने ग्रासले आहे. मंगळाच्या कुंडलीमध्ये धुळीचे लोट आले आहेत.

गेली अनेक दशके मानवास मंगळाने वेध लावले आहेत. या दशकांच्या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांना मंगळावरील धुळीचे लोट किंवा वावटळे जास्त आव्हानात्मक आणि मोहक वाटतात.

मंगळ ग्रह माहिती

जुन महिन्यातील हे सारे फोटोज आहेत. उजवीकडुन डावीकडे पाहत आल्यास मंगळावरील धुळीच्या लोटांमुळे, मंगळावरील आकाश कसे हळु हळु धुळीने भरुन जात आहे तसेच, सुर्याला देखील झाकुन टाकत आहेत हे दिसते. नासाच्या ऑपॉर्च्युनिटी रोव्हर च्या कॅमे-याच्या लेन्स मधुन दिसणा-या अनेक छयाचित्रांचे हे संकलन.

नासाचे ऑपॉर्च्युनिटी रोव्हर  हे मानवरहित रोव्हर म्हणजे यंत्रमानवच, मंगळाच्या साडेचौदा वर्षांच्या अभ्यास मोहिमेवर आहे. त्या यानाचे सर्व संचालन नासाचे शास्त्रज्ञ पृथ्वीवरुन करीत आहे. नासाच्या वेबसाईटवर नुकतेच त्यांनी हे यान काही काळापुरते निःचेष्ट झाले असल्याचे जाहीर केले. याचे कारण आहे मंगळावरील धुळीचे वादळ. धुळीची ही वादळे मंगळावरील दिवसाला रात्रसदृश्य परीस्थितीमध्ये रुपांतरीत करतात. धुळीच्या वादळामुळे, या यानाच्या बॅटरीज रीचार्ज होत नाहीत. यानावर बॅटरी रीचार्ज करण्यासाठी जे सौर उपकरण आहे त्यावर धुळ बसल्याने, बॅटरी रीचार्ज होत नाहीयेत.

मंगळ ग्रहाविषयी माहिती

मार्स रेकोनेसन्स ऑर्बीटर, या मंगळाभेवती फिरणा-या यानाने, मंगळावर उतरलेल्या मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर या स्वयंचलित गाडी च्या आसपास २००७ मध्ये धुळीच्या वादळाची टिपलेली ही छायाचित्रे.

या महिन्यामध्ये मंगळाच्या वातावरणामध्ये प्रचंड मोठे धुळीचे वादळ थैमान घालीत आहे. आणि हे काही पहिलीच वेळ नाहीये धुळीच्या वादळाची. २००७ मधील वादळामध्ये ऑपॉर्च्युनिटी रोव्हर एक महिनाभर अचल होते. धुळीचे प्रचंड आवरण सौर उपकरणांवर आल्याने बॅटरीमधील ऊर्जा संपण्याच्या स्थितीला आली होती. पण पुन्हा सुर्यप्प्रकाश जसा उपलब्ध झाला तशी अभियंत्यांनी योग्य ती पावले उचलुन रोव्हरला पुर्व स्थितीला आणले.

मंगळ ग्रहाचा अभ्यास

धुळीच्या आवरणाने रोव्हरचे काय होते याचे हे दोन फोटोज. डावीकडील फोटो जाने २०१४ मधील आहे आणि उजवीकडील फोटो मार्च २०१४ मधील आहे.

१९७१ मध्ये नासाचे पहिले, मरीनर ९ हे यान मंगळाच्या कक्षेत गेले. पण जेव्हा ते कक्षेत फोचले तेव्हा नेमके मंगळावर धुळीचे वादळ आले होते. त्यामुळे पोहोचुन देखील एक महिनाभर शास्त्रज्ञांना काहीच हाती आले नाही. पण जसे हे वादळ शांत झाले तसे मंगळाच्या पृष्टभागाचा पहिला फोटो पहावयास मिळाला. तो खाली आहे.

मंगळ ग्रहाचा अभ्यास

मंगळाच्या पृष्टभागाचा देखावा. १९७१ मध्ये मंगळाच्या कक्षेत जाणारे पहिले मानवीय यान म्हणजेच मरीनर ९. या फोटो मध्ये मंगळावरील प्राचीन नद्यांची खोरी देखील पाहता येऊ शकतात.

द माशन नावाच्या सिनेमामध्ये मॅट डेमन ने जे पात्र साकारले आहे त्या पात्राला मंगळावर वादळामुळे अडकुन पडावे लागते असे दाखवले आहे. खरतर मंगळवरील वातावरण अत्यंत विरळ असल्याने त्यावरील वादळ देखील मोठे असुनदेखील विध्वंसंक नसते. ते सौम्य धुळींच्या तरंगणा-या लहरींचे असते.

धुळीची  वादळं अभ्यासातील अडचण जरी असले तरी त्यामुळे मंगळावरील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. खालील फोटो मध्ये असेच वादळ दिसत आहे की जे घरंगळत, त्या प्राचीन नद्यांच्या खो-यांमधुन डाव्या बाजुला सरकताना दिसते आहे.

गडगडत सरकणारे धुळीचे वादळ

गडगडत सरकणारे धुळीचे वादळ

धुळीची वादळे काही फक्त मंगळावरच असतात असे नाही. आपल्या वसुंधरेच्या पृष्टभागावर देखील अशी धुळीचे वादळे येत असतात. 

सांगा बर पृथ्वीवर कुठ येतात अशी धुळीची वादळं?

 

 

 

Facebook Comments

Share this if you like it..