डोंगर उतार तसेच माळरानांवर सर्वत्र आढळुन येणारी ही वर्षायु वनस्पती पावसाळ्याच्या शेवटास सर्वांचे लक्ष वेधुन घेते. विविध रंगांची फुले येणा-या प्रजाती यामध्ये आहेत. एखाद्या माळावर अथवा डोंगर उतारावर एकाच रंगाच्या फुलांनी बहरलेले तेरड्याचे ताटवे त्या ठिकाणाला रंगीत करुन टाकतात. गौरी गणपतीच्या दिवसांत तोरणा किल्ल्याचे डोंगर उतार गुलाबी रंगाने रंगविले जातात ते याच फुलांच्या बहराने.

तोरणा किल्ल्यावरील तेरड्याचा ताटवा

शेकडो-हजारो किंवा लाखो वर्षे झाली असतील कदाचित ही वनस्पती तिचे अस्तित्व टिकवुन आहे. दरवर्षी गाई-गुरे-म्हशी-शेळ्या मेंढ्या चरतात, डोंगर-उताराला, माळरानांना वणवे लागतात तरीदेखील या वनस्पतीचे अस्तित्व अद्याप टिकुन आहे. पिकलेल्या फळातुन/ शेंगातुन खाली पडलेले बीज वणव्यासमोर देखील टिकतात व रुजतात.

या वनस्पतीला भारताच्या अनेक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात मात्र सर्वत्र तेरडा याच नावाने ओळख आहे. इंग्रजी मध्ये balsam, impatiens, jewel weed, ladies’ slippers, rose balsam, spotted snapweed अशा अनेक नावांनी याला ओळ्खले जाते. शास्त्रीय नाव impatiens-balsamina असे आहे तर मराठी मध्ये तेरडा नावा व्यतिरिक्त गुलमेंधी हे देखील नाव काही ठिकाणी (गुजरात जवळचा भाग) वापरले जाते. कोकणात चिर्डा, तेरडा म्हणतात. संस्कृतात दुष्परिजती असे नाव आहे. कश्मिरी भाषेत बन-तिल किंवा ततूर म्हणतात. बंगाली मध्ये दोपाती, गुजराथी  -गुलमेंधी, हिंदी – गुलमेहंदी, कन्नड – कर्ण-कुंडल, मल्यालम मध्ये थिलम अशी वेगवेगळी नावे भारतात वापरली जातात.

साधारण गवताचे जसे आयुष्य असते तसेच याचे असते. पाऊस पडायला सुरुवात झाली की मागील वर्षी वा-यासोबत इतस्तत पसरलेले बीज अंकुरतात. गौरी गणपती च्या आसपास फुलांचा बहर असतो. एक फुल एकदा फुलले की ते तीन ते चार दिवस फुललेले राहते. एका झाडास डझनपेक्षा जास्त फांद्यांना फुले येतात. कालांतराने या फुलांच्या शेंड्यांना शेंगा येतात. शेंगा अगदी छोट्या असतात व जसजशा पक्व होऊ लागतात आंत मध्ये बीज देखील तयार होतात. बीज खुपच छोटे म्हणजे खसखस च्या आकारापेक्षाही छोटी असतात. शेंगा परिपक्व झाल्यावर त्यांना अगदी हलकासा स्पर्श जरी झाला तरी फट असा हलका आवाज येऊन ही शेंग टचकन फुटते व बीज विखुरतात. लहान मुलांचा हा आवडता खेळ! यामुळेच याचे बीज संकलन अवघड होऊन जाते. शेंगा फुटण्याच्या या पद्धतीमुळेच या वनस्पती ला इंग्रजीमध्ये टच-मी-नॉट असे देखील म्हणतात. तिकडे इंग्रजीमध्ये touch me not असे ‘लाजाळु या अर्थाने’ म्हंटले जाते. आपण म्हणतो व ओळखतो ती लाजाळु वनस्पती वेगळीच आहे व ती सर्वांना माहीत आहे देखील आहे.

तेरड्याला आलेल्या शेंगा

जेव्हा ही वनस्पती नवीननवीन उगवते तेव्हा याचे कोवळे देठांची व पानांची भाजी केली जाते असे पीएफएएफ या संकेतस्थळावर समजते.  याच संकेतस्थळानुसार याच्या पानांचा रस मोस/चामखीळ घालवण्यासाठी वापरतात तर फुले शीत असल्याने भाजलेल्या जखमेवर गुणकारी आहे असे समजते. फुलांचा रस सर्पदंशावर वापरतात मात्र असा वापर भारतात कुठे केला जातोय हे मात्र स्पष्ट होत नाहीये. बीजांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांत देखील करतात तसेच गरोदर महिलेला प्रसुती वेदना येत असताना ताकत यावी म्हणुन देखील बीयांची भुकटी दिली जाते. (कुणीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ या लेखाच्या आधारे तेरड्याचा किंवा अन्य कोणत्याही वनस्पतीचा उपयोग औषधासाठी करु नये) हे सर्व उपयोग खरोखरीच महाराष्ट्रात भारतात कुठे केले जातात का याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. कदाचित असे उपयोग केले जात असतील पुर्वी पण आपण ते ज्ञान गमावुन बसलो आहोत की काय असे वाटु लागले आहे.

ही एक औषधी वनस्पती आहे पण अद्याप यावर भारतात संशोधन नीटसे झाले नाही असे दिसते. भारतात मुबलक प्रमाणात आढळणा-या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास करुन जर उपयुक्त अर्क अथवा अवयव वापरण्याचे तंत्र विकसित झाले तर लाखो लोकांस रोजगार मिळु शकतो.

या व्यतिरीक्त परसबागेत अथवा बागेत लावण्यासाठी देखील आपल्याकडे याचा वापर केला जातो. कास पठारावर फुलणारे या फुलांचे ताटवे मन मोहुन टाकतात. गौरी गणपतीमध्ये घरात गौरी बसवताना आवर्जुन तेरडादेखील गौरी शेजारी ठेवला जातो.

याचाच एक प्रकार म्हणजे पान तेरडा (Impatiens Aculis Dalz. /  rock balsam) ही वनस्पती देखील मोहक आहे. पान तेरडाचे वैशिष्ट्य असे की ही वनस्पती खडकावर वाढते. पान-तेरड्याचा मी तोरणागडावर काढलेला फोटो खाली आहे.

तोरणा किल्ल्यावरील पान तेरडा

याचाच एक दुरचा भाऊ/बहीण म्हणजे हिमालयन बालसम (Impatiens Glandulifera). काही देशांत हिमालयन बालसम लावण्यास बंदी आहे कारण हे खुप वेगाने पसरते.

पांध-या, लाल, जांभळ्या, गुलाबी रंग असलेली तेरड्याची फुले मी पाहिली आहेत. तुमच्या कडे अजुन विशेष माहिती असेल तेरड्याविषयी तर अवश्य कमेंट मध्ये अथवा माझ्या व्हॉट्सॲपवर कळवा जेणे करुन आपण ती माहिती जतन करुन ठेवु!

तुमच्या भागात तेरड्याचा काही विशेष उपयोग परंपरागत खाद्य अथवा औषध म्हणुन केला जात असेल तर अवश्य कळवा.

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]