निसर्गात बासरीवादन – श्री सुनिल अवचट

निसर्गाने मुक्त हस्ताने जिथे नदी, नाले, डोंगर, द-या, झाडे, जंगले, पाने , फुले यांची उधळण केली आहे ते ठिकाण म्हणजे पुण्याजवळील निसर्गातील स्वर्गच होय. निसर्गाच्या कुशीत आहे, बाजुने खळखळ वाहणारी नदी आहे, चारी दिशांनी डोंगर आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तोरणा आणि राजगड या दोन किल्ल्यांच्या पायाशी शिवरायांना आणि धरती मातेला जणु अभिवादन करीत आहे अशी आपली निसर्गशाळा. खालील फोटोंपैकी पहिला जो फोटो आहे तो मध्यरात्री बारा वाजता , कोजागरीच्या चंद्रप्रकाशात विशाल जगताप याने टिपला आहे.

खरतर इथे खुप जास्त, सोप्या मार्गाने पैसा कमाविण्यासाठीचे साधन म्हणजे रीसॉर्ट बनविता येणे सहज शक्य होते , आहे तरीही निसर्गशाळेच्या सर्वच मित्र परिवाराने , हितचिंतकांनी हा मोह आवरीत निसर्गशाळेला ख-या अर्थाने निसर्गशाळाच राहु दिले आणि सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.
याचाच भाग म्हणुन आपल्या इथे सातत्याने आपण निसर्गाशी जवळीक साधण्यासाठीचे उपक्रम, कार्यक्रम घेऊन येत असतो.

याच सातत्याचा एक भाग म्हणजे निसर्गात संगीत कार्यक्रमांचे आयोजन करणे होय. सध्या निसर्ग म्हणजे हुल्लडबाजीचा अड्डा होत असताना निसर्गाला अनुसरुन, निसर्गाचा आदर करीत , निसर्गाशी एकरुप होत आपण अभिजात संगीतकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन निसर्गशाळा येथे करतो आहोत. याच शृंखलेतील नुकताच पार पडलेला कार्यक्रम म्हणजे प्रख्यात बासरीवादक श्री सुनिलजे अवचट यांच्या बासरी वादनाचा.

निसर्गशाळा नक्की कशी आहे ते खालील फोटोंमध्ये पहा..

या कार्यक्रमाचे औचित्य साधुन आपण  आणखी एक गोड कार्यक्रम देखील योजला तो म्हणजे निसर्गशाळेच्या नवीन लोगोचे अनावरण. निसर्गशाळेचा हा नवीन लोगो, आपल्या पहिल्या लोगोचेच उत्क्रांत रुप आहे. आपला पहिला लोगो यशदीप ने बनविला. मनुष्य, निसर्ग, पक्षी, झाडे, धबधबा यांतील परस्पर संबंध आपल्या लोगो मध्ये दाखवले आहे. ती कल्पना लक्षात घेऊन नवीन लोगो मित्र विशाल जगताप या प्रोफेशनल डीजाईनर ने बनविला. यशदीपच्या सर्वच्या सर्व चिन्हांचा बोध होऊन, अधिक सुसंगत असा लोगो विशाल ने बनविला आहे. या लोगोचे अनावरण देखील अतिशय कल्पक पणे संजय पारखीने योजले. अनावरणाची ही कल्पना इतकी सुंदर आहे की उपस्थित सर्वांना ती खुपच जास्त आवडली. खालील विडीयो मध्ये पहा आपल्या नव्या लोगोचे अनावरण नक्की कसे झाले.

आठ ऑक्टोबर ला झालेल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण निसर्गशाळा येथे संगीतातील आद्य स्वर-वाद्य बासरी वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कालप्रवाहात बासरीचा उलटा शोध घेतला तर समजते की बासरी किमान ४० हजार वर्षांपासुन वाजवली जात आहे. हे शोध उत्खणणातुन लागलेले आहे.

कलाकारांची थोडक्यात ओळख

आपल्या कार्यक्रमासाठीचे मुख्य कलाकार बासरीवादक श्री सुनिल जी अवचट हे होते. सुनिलजींच्या म्हणण्यानुसार त्यांची खरी ओळख त्यांच्या गुरुंशिवाय अर्धवटच आहे. पंडीत अरविंद गजेंद्रगडकर, केशव गिंडे आणि पंडीत हरिप्रसाद चौरसिया या बासरीतील महागुरुंकडुन सुनिलजींचे शिक्षण-प्रशिक्षण झाले आहे. सुनिलजी वाजवितात त्या सा-या बास-या ते स्वतः बनवितात. देश-विदेशात , वर्तमान काळात बासरी चे सुर पोहोचविण्याचे काम सुनिलजी करीत आहेत.

उपस्थित श्रोत्यांना बासरीची माहिती सांगताना सुनिलजी

यश सोमण हे तरुण तबला वादक , इतके सफाईदार पणे तबला वाजवितात की तबल्यावर त्यांची बोटे पडताना प्रसंगी दिसतच नाही इतका वेग घेतात. या कार्यक्रमात तबल्यासोबतच यश यांनी एकुण सहा वेगवेगळी वाद्ये वाजवली. 

ताल-सुरांचा मेळ बसविताना यश सोमण, कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी

आधुनिक वाद्य तरीही भारतीय शास्त्रीय आणि सिनेमा मेलडिज मध्ये चपखल पणे बसणारे असे वाद्य म्हणजे कीबोर्ड होय. कीबोर्ड वर सरसर बोटे फिरणार होती श्री मंदार देव यांची.

कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीताने झाली. त्याप्रसंगी बोलताना सुनिलजी खालील विडीयो मध्ये

जगभरात बासरीचे अनेक प्रकार आहेत, त्यातही भारतीय बासरी हा एक प्रसिध्द असा प्रकार आहे ज्याला इंग्रजी मध्ये इंडीयन साइड फ्लुट म्हणतात. ही केवळ भारतात जास्त करुन वाजवली जाते. भारतीय शास्त्रीय संगीतात बासरी पुर्वी नव्हतीच ही माहिती देखील सुनिलजींकडुनच मिळाली सर्व श्रोत्यांना. पंडीत पन्नालाल घोष यांनी भारतीय बासरीमध्ये अनेक प्रयोग करुन शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल अशी बासरी कशी असावी तशी स्वतः बनविली. तिथपासुन पुढे म्हणजे मागील केवळ चाळीसेक वर्षांमध्येच बासरीने भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. बासरीचा आणि बासरीसाठी मेहनत घेणा-या कलाकारांचा हा अल्पावधीतला प्रवास थक्क करणारा आहे.
सुनिलजींनी नंतर अनेक राग वाजविले. कीबोर्ड भारतीय शास्त्रीय संगीतात वापरला जाऊ शकतो व तो संगीताला अजुन जास्त माधुर्य देऊ शकतो हे मंदार देव यांच्या संगतीने समजले. तबल्यावर यश सोमण यांनी देखील सुनिलजींना खुप चांगली साथ दिली.

बासरी वादन कार्यक्रम

सुनिलजी आणि यश सोमण यांच्यातील रंगतदार जुगलबंदीची एक झलक खालील विडीयो मध्ये पहा

मध्यंतरामध्ये आलेल्या सर्व श्रोत्यांना अळुवडी, ढोकळा आणि टोमॅटो सुप असा अल्पोपहार ठेवला होता. बासरी आणि संगीत रजनी सर्वांना जितकी आवडली तितकी मध्यंतरातील हा अल्पोपहार देखील खुप आवडल्याचे सर्वांनी सांगितले. सर्वांना खुष करणा-या या कामाची जबाबदारीचे निर्वाहन आनंदाने आणि यशस्वीपणे केले ते मित्र नितीन भोसले यांनी.

मध्यंतरानंतर

मध्यंतरानंतर सुनिलजींनी बासरीविषयी अधिक माहिती देत अनेक प्रकारच्या बासरी कश्या असतात ते दाखवले , वाजवुन देखील ऐकवले आणि त्या त्या बासरीचा कोणत्या काळी कधी कसा वापर लोकसंगीत असो वा सिनेमा संगीत असो त्यात झाला ते प्रत्यक्ष वाजवुन दाखवले.

पहाडी धानी धुन वाजवताना सुनिलजी खालील विडीयो मध्ये

आता कार्यक्रमाला धमाल रंगत यायला सुरुवात झाली, इतकी की टाळ्यांचा कडकडाट सतत सुरुच होता प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी आणि कधीकधी तर श्रोते देखील गाणी गाऊ लागायचे.

एकापाठोपाठ एक अजरामर गाणी आणि त्यामधील बासरी आमच्या सर्वांसमक्ष जिवंत होत होती. टाळ्या आणि गाणी गुणगुणने श्रोत्यांकडुन सुरुच होते.

निसर्गशाळा येथे, निसर्गाच्या कुशीत हा कार्यक्रम आहे म्हणुन सुनिलजींनी आवर्जुन निसर्ग, डोंगर, नद्या यांवरील देखील काही रचना सादर केल्या. त्यातील मला सर्वात जास्त आवडलेल सादरीकरण खालील विडीयोमध्ये पहा…

इतका सुंदर निसर्ग, चांदणी रात्र, नदीचा किनारा असे सगळे असताना कार्यक्रमात मात्र अद्याप हे कसे आले नाही असा विचार मनात येतो न येतो तोच सुनिलजींना खालील अप्रतिम वादन केले..

या फोटो / व्हिडीयो स्टोरीमध्ये अगदी मोजकेच व्हिडीयो टाकु शकलो आणि या लेखात टाकले आहेत ते श्रोत्यांनी आपापल्या मोबाईल मध्ये चित्रीत केलेले असल्याने त्यात अचुकता, नीटपणा कदाचित आढळणार नाही पण कार्यक्रम किती उच्च दर्ज्याचा झाला याची कल्पना नक्कीच येऊ शकते. 
व्यावसायिक छायाचित्रकार श्री निखिल दिक्षित यांनी केलेले चित्रण अद्याप यायच आहे, ते जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ते देखील तुम्हाला निसर्गशाळेच्या युट्युब चॅनेल वर नक्कीच पाहता व ऐकता येईल.
उपस्थित सर्व श्रोत्यांपर्यंत निर्वेध आणि अचुक नाद, स्वर पोहोचवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा , सांऊड सिस्टम आणि प्रकाश इ व्यवस्था आपले राजुभाई म्हणजे राजु कांबळे यांनी केली होती.

सुनिलजींनी कार्यक्रमाचा शेवट त्यांनी स्वतः बनविलेल्या एका रचनेने केला. त्या रचनेला नावच त्यांनी Nature’s Bounty असे ठेवले. निसर्गाच्या सान्निध्यात झालेला हा संगीत रजनी कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित श्रोत्यांना खुपच आवडला आणि आशा आहे वरील शब्द, फोटो, व्हिडीयो पाहुन तुम्हाला देखील आवडला असेलच

आमचा युट्युब चॅनेल पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा..

Facebook Comments

Share this if you like it..