साहसाचे वेड की वेडे साहस?
हा तानाजी कडा खरंच कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?” कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?”
आणखीही बरंच काही विचारत होते तात्या.
पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.