की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!
‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’ 24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक प्लॅन केला, ट्रेकिंग चा फारसा काही अनुभव आमच्या पैकी कुणालाही नाही, पण मी स्वतः 2 वर्षांपूर्वी दुसऱ्या मित्रांसोबत राजगड one day return ट्रेक केला होता. त्यावेळी आमच्या ग्रुप मध्ये मोटरसायकल कुणाकडेही नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरून आम्ही स्वारगेट एसटी स्टँड ला जमलो, नेहमीप्रमाणे आमचा मित्र हर्षद ने जो उशीर करायचा तो केलाच, असो. हा ट्रेक मुक्काम करायच्या दृष्टीने प्लॅन केला होता त्यामुळे सर्वांनी भरपुर पाणी, ट्रेक करताना तोंड चालू राहावे म्हणून ‘चखना’, झोपण्यासाठी चटई आणि पांघरूण, आणि सर्वात महत्वाचं रात्रीच्या जेवणासाठी मॅगी ची पाकिटे आणि एक ‘भलं मोठ्ठ’ पातेलं जे भाड्याने घेतलं होतं असा हा सगळा ‘बोरीया बिस्तर’ आम्ही सोबत घेऊन आम्ही निघालो होतो. स्वारगेट ते राजगड एसटी प्रवास आम्ही सर्वांनी गाण्यांच्या भेंड्या वगैरे करत मस्त एन्जॉय केला. गाडी कधी सातारा रोड वरून कात्रज घाटापालिकडे जाऊन हायवेय ला लागली कळलेच नाही. पुढे नसरापूर ओलांडल्यावर गावाकडे आल्याचे लगेच जाणवते, पुणेकरांना शहरापासून एवढ्या जवळ गावाकडील वातावरण आणि निसर्ग अनुभवता येणं हे भाग्य च म्हणावं लागेल. पुढील गावे ओलांडुन गाडी राजगड पायथ्याला आली सुद्धा. आम्ही आमचा सगळं गाश्या उचलून पायथ्याशी आलो, तिथे हॉटेल मध्ये पोटभरून नाश्ता केला, थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता चढण्याच्या तयारीतच होतो तेवढ्यात एकाला पोटाचा त्रास सुरू झाला. आम्ही सगळे त्याला म्हणू लागलो की चांगला मुहूर्त बघून पोट बिघडले. आधीच उशीर झाला होता, ट्रेक तर करायचा होता आणि त्याला एकटा सोडून पुढे जाणे शक्य नव्हते. मग थोडा वेळ तिथे थांबलो, त्यात मग त्याची टिंगल उडवणे, हश्या, त्या अवस्थेत त्याचे फोटो काढणे असे सगळे करमणुकीचे प्रकार झाले आणि मग त्याचा सगळा कार्यक्रम आटोपून एकदाची चढायला सुरुवात केली. राजगड खूप मोठा आहे आणि ट्रेक देखील अवघड आहे उगाच नाही त्याला गडांचा राजा म्हंटल जात! ट्रेकिंग चा सराव आम्हाला नसल्या मुळे दम लागणे साहजिकच होते, आम्ही खूप हळू हळू, थांबत थांबत चढत होतो, आमच्या सोबत असलेल्या सामानाचा बोझ्या पण भरपूर होता त्यात ते पातेलं. भरपूर पाणी पीत होतो, हळू हळू पाणी सपंत होतं, त्यामुळे एकमेकांना सूचना देत होतो की पाणी कमी प्या कारण वर मुक्काम करायचा आहे आणि उद्या पर्यंत पाणी पुरायला हवे. चढत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या विविध प्रकारचे पक्षी, कीटक, मुंग्यांची वारुळे आणि वारुळाचा एक वेगळा प्रकार ज्याला ‘गडमुंगी’ असे म्हणतात तो सुद्धा पाहायला मिळाला, याचे नाव आधी माहीत नव्हते, अलीकडेच हेमंत कडून कळाले. माकडे सुद्धा बरीच होती त्यांची भीती सुद्धा वाटत होती. माझ्याकडे Bushnell ची 10×25 Binocular होती, यातील 10 म्हणजे त्या दुर्बिणीची पॉवर म्हणजे त्यातून एखादी गोष्ट किती पट मोठी दिसनार हे कळते आणि 25 म्हणजे त्या दुर्बिणीच्या पुढील भिंग किती व्यासाचे आहे हे कळते, भिंगाचा व्यास जेवढा मोठा तेवढी त्यातून दिसणारी प्रतिमा प्रखर किंवा तेजस्वी दिसते. ही दुर्बीण सुद्धा मित्राकडून बॉरोव केली होती, चढत असताना खालील गावे, दुरवरील डोंगर, राजगड चा कडा या सर्व गोष्टी खूप जवळ दिसत होत्या. असे करता करता आम्ही बऱ्याच वर येऊन पोहोचलो, चढायला सुरुवात करून दीड तासापेक्षा जास्त वेळ झाला होता तरी सुद्धा अजून निम्म्याहून जास्त चढणे बाकी होते. आम्ही खूप दमलो होतो. मग आम्ही एके ठिकाणी झाडाची सावली बघून थांबलो. सगळ्यांना भूक लागली होती मग तिथेच आम्ही एकत्र बसून घरून आणलेला डबा खाल्ला, आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. विश्रांती झाल्यावर सगळ्यांना एकदम फ्रेश वाटले, आणि एका नवीन जोश मध्ये सर्वांनी पुन्हा चढायला सुरुवात केली. चढताना माझ्या Sony च्या Walkman W580 फोन मधून फोटो घेणे चालूच होते. अस करत करत आम्ही जवळ जवळ साडेतीन ते चार तासांनंतर चोरदरवजा ला एकदाचे पोचलो. एवढ्या प्रचंड चढाई केल्यानंतर सगळे थकले होते पण जेव्हा चोर दरवाजातून आत शिरलो तेव्हा सगळा थकवा जणू अचानक गायब च झाला. आपण एवढ्या उंच गडावर चढून वर आलो यावर विश्वास च बसत नव्हता. आम्ही तेथील कठड्यावर थोडा वेळ बसून आराम केला. त्यांनतर पुढे थोडा किल्ला चढला की तिथे मोठे पद्मावती तळे आहे. तिथेच वर एक मंदिर आहे तिथे आम्ही आमचा बस्तान मांडलं. तिथे कौलारू बांधकाम आहे त्याच्या पुढे व्हरांडा आहे, बसायला जागा आहे, तेथून खालील तळ्याचा छान view मिळतो, तिथे आम्ही आराम केला. तिथे बसल्यावर असं वाटत होतं की आपलंच स्वतः च घर आहे. आराम झाल्यावर आम्ही रात्रीच्या तयारीला लागलो. सर्वप्रथम आग पेटवण्या साठी सरपण हवं होतं. सगळे चारी दिशांना पसरलो लाकडं, वाळलेलं गवत हे गोळा करत असताना आम्हाला गुरांचे वाळलेलं शेण सुद्धा सापडत होत ते आम्ही गोवऱ्या मानून गोळा केलं. काही ठिकाणी इतर प्राण्यांच्या वाळलेल्या विष्ठा सुद्धा होत्या त्या सुद्धा आम्ही गोळा केल्या ते नेमकं काय होत हे नंतर आम्हाला कळलं जाऊदे त्याबद्दल न बोललेलं च बरं, असो. अंधार पडायच्या आधी आग पेटवायची होती नंतर धावपळ नको. शेणाच्या गोवऱ्या आणि वाळलेलं ‘ते’ जे काही होत ते यांच्यामुळे आग लवकर पेटली. मग आम्ही त्यात मोठ्या लकडाचे तुकडे टाकले, तोपर्यंत अंधार पडला होता. त्यावर मग आम्ही सोबत आणलेलं ते भव्य पातेलं ठेवलं आणि त्यात आमच्या जवळील पिण्याचे पाणी ओतून मॅगीची पाकिटे फोडून टाकली. सतीश ने बनवायचा task हाती घेतला होता, मग मेणबत्तीच्या प्रकाशात आणि पातेल्यामध्ये टॉर्च दाखवत कशीबशी एकदाची पातेलंभरुन मॅगी तयार झाली. सगळ्यांनी मॅगीचा आस्वाद घेतला, पण मला काही ती मॅगी आवडली नाही, काही केल्या ती माझ्या घशाखाली उतरत नव्हती. कारण मी मॅगीच्या बापतीत खूप perticular आहे. पण काय करणार, दुसरा काही पर्याय नव्हता, अश्या ठिकाणी जिभेचे चोचले पुरवले जात नाहीत, जे समोर येईल ते गपचूप खावं लागतं. सर्वांचं मॅगीवजा जेवण झाल्यावरही आग तशीच चालू होती, रात्री शेकण्यासाठी आम्ही त्यात अजून लाकडे टाकली. असा सगळा कार्यक्रम उरकल्यावर आम्ही जरा निवांत झालो. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे आठ वाजले असावेत सहज वर लक्ष गेलं पूर्ण आकाश हजारो चांदण्यांनी गच्च भरलं होतं एवढे तारे मी आज पर्यंत आयुष्यात कधीच बघितले नव्हते आणि आजही राजगड सारखं आकाश मी दुसरीकडे कुठेही पाहिलं नाही. पश्चिमेकडे चंद्रकोर क्षितिजाला स्पर्श करत होती त्याच्यावर गुरु मावळण्याच्या बेतात होता त्याच्यावर मृगनक्षत्र ठळक दिसत होते, पूर्वेकडे लालसर तांबूस मंगळ उगवलेला दिसत होता. त्यावेळी मला ही अक्षरं आमची एवढी माहिती नव्हती फक्त मृग नक्षत्र आणि सप्तर्षी सोडले तर मला दुसरं कुठलंही नक्षत्र माहित नव्हतं. वरील नावे मी नंतर स्टार चार्ट बघून शोधून काढली आणि आपल्याला त्या दिवशी आकाशात काय काय दिसत होतं याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. मला राजगड ट्रेक अविस्मरणीय वाटण्याचे खरं कारण तेव्हा बघितलेलं तार्यांनी भरलेलं गच्च आकाश या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. त्या रात्री मी माझ्याकडे असलेल्या छोट्या दुर्बिणीने बघण्याचा प्रयत्न केला पण त्यातून मला काही दिसले नाही कारण तेव्हा मला आकाश निरीक्षणा बद्दल
ट्रेक कसे करावे? काय आहेत ट्रेकिंगचे अद्याप न लिहिलेले नियम?
१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२ पर्यंत छोटे छोटे ट्रेक तरी करीत असायचो कधी मित्रांसोबत तर कधी विद्यार्थ्यांसोबत. पण नंतर मात्र अजिबातच जमले नाही. करीयरच्या ओघामध्ये गडवाटा जणु अनोळखीच झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये एकदा, टेकमहिंद्रा मध्ये नोकरीत असताना हरिश्चंद्र गड करण्याचा योग आला. वैयक्तिक फिटनेस नव्हताच. त्यापुर्वी मी हरिश्चंद्रगड ४-५ वेळा सर केला होता विविध वाटांनी. पण यावेळी आमच्या ग्रुपमध्ये सर्वात शेवटचा, थकलेला गडी मीच होतो. कसाबसा गड चडुन मी गडावर, मुक्कामाच्या गुहेशेजारी पोहोचलो. पावसाळ्याचे दिवस होते. गडावर जणु जत्राच होती. किमान चार पाचशे लोक किल्ल्यावर मुक्कामाला असतील असे ती गर्दी पाहुन वाटले. आम्हाला मुक्कामाला जागाच मिळेना. कशीबशी एक छोटीशी गुफा शोधली व त्यात मुक्काम केला. Our Upcoming Events Feb 23 February 23 – February 25Nature Camp for Special KidsFind out more Mar 02 March 2 – March 3Stargazing near PuneFind out more Mar 08 March 8 – March 10Woman Only Nature & Adventure RetreatFind out more दुस-या दिवशी सकाळी सकाळी गडावर जे दृश्य पाहिले ते पाहुन, मनोमन पुन्हा त्या गडावर जायचेच नाही असे ठरवले. जे काही लोक मुक्कामाला होते त्यापैकी अक्षरशः एकाला देखील गड-किल्ल्यांचे विधीनिशेष माहित नव्हते. मल=मुत्र विसर्जन तस पाहता अगदी स्वाभाविक व नैसर्गिक क्रिया आहे. पण त्या दिवशी गडावर लोकांनी अक्षरशः जागा मिळेल तेथे, उघड्यावर मल विसर्जन करताना पाहुन खुपच विचलीत झालो. आपण गड-किल्ल्यांवर जातो कशासाठी? सह्याद्रीच्या विराट रुपाचे दर्शन घेऊन आपलेही जीवन असेच उन्नत व स्थिर करण्याची प्रेरणा कित्येकांना या ट्रेकिंगमधुन मिळत असते. वेल्ह्यातील गोप्या घाटाच्या माथ्यावर – वर्ष २००७ पण जेव्हा गड-किल्ल्यांच्या मस्तकांवर अशा प्रकारे कुठेही मलमुत्राचा अभिषेक होत असेल व त्यामुळे दुर्गंधी व घाण पसरत असेल तर अशा सह्याद्रीतील स्वर्गाकडे जाण्याचे इच्छा कधी होणारच नाही आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी? मागील महिन्यामध्ये राजगडाचा बालेकिल्ला वणव्यात जळाला. आणि दरवर्षी हे असे होतच असते. मी दरवर्षी राजगड, तोरणा या किल्ल्यांना जळताना पाहतो. आणि अगतिक होऊन पुढे निघुन जातो. गड किल्ल्यांवर ही जी आग लागते त्याचे कारण देखील निसर्गाच्या अलिखित नियमांची माहिती नसणे हे आहे. किल्ल्यावर मुक्काम केल्यावर दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. कित्येकदा शेकोटी पेटवली जाते. या चुल व शेकोटी मुळेच जास्त करुन किल्ल्याच्या डोंगरांना आग लागते. ज्या गड किल्ल्यांकडे आपण दैवत म्हणुन पाहतो, छत्रपती शिवरायांचे अधिष्टाण म्हणुन गड-किल्ल्यांना आपण वंदन करतो, ज्या गड–किल्ल्यांच्या अंगभुत नैसर्गिक सौंदर्याकडे पाहुन आपण मोहीत होतो, त्याच किल्ल्यांना आपणामुळे वणवा लागतो. वणवा लागल्यामुळे निसर्गाचे जेवढे नुकसान होते तेवढे अन्य कशानेही होत नाही. मागील पावसाळ्यात जर एखादे रोपटे जन्माला आले असेल तर फेब्र-मार्च पर्यंत वीतभर तरी वाढलेले असते. त्या रोपट्यास यापुढे पाण्याची देखील आवश्यकता नसते. त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात. पण अशातच जर वणवा लागला तर ते ठामपणे, ऊन वारा अंगावर घेणारे रोपटे वणव्यात अक्षरशः होरपळुन जाते. आणि दरवर्षी अगदी हेच होतेय. त्यामुळेच आपणास किल्ल्यांवर नवीन झाडे, वृक्ष तयार झालेले दिसत नाहीत. सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी. दौलताबाद किल्ल्यास लागलेल्या वणव्याचा फोटो आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी? त्याचे नुकसान करण्यासाठी? गड-किल्ल्यांवर प्लास्टीकचे खच सापडतात. दारुच्या बाटल्या सापडतात. काय हे? काही निस्सीम निसर्गप्रेमी – दुस-यांनी केलेला कचरा साफ करताना मग प्रश्न असा येतो की किल्ल्यांवर जास्त लोक जाण्यायेण्याने मलमुत्र विसर्जन किल्ल्यांवर होणारच, वणवे लागणारच, प्लास्टीकचे ढिग तयार होणारच तर काय लोकांनी किल्ले भटकंती करुच नये? अवश्य करावी. पण ती करताना खालील गोष्टींचे भान अवश्य ठेवावे. या लेखात मी जे पुढे लिहिणार आहे ते आजवर अलिखित नियम होते निसर्गाचे. निसर्गाचे विधीनिषेध होते. आपण सर्वांनी याचे काटेकोरपणे पालन करणे खुप आवश्यक आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे? तुम्ही गडकोटांचा अभ्यास करता? तुम्हाला सह्याद्रीची भटकंती करायला आवडते? तुम्ही एखादा ट्रेकिंग ग्रुप चालवता? तुम्ही विविध ट्रेक ऑर्गनाईज करता? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर इथुन पुढ तुम्ही जे काही वाचणार आहात ते वचन तुम्ही स्वःतस सह्याद्रीला द्या. सह्याद्री नुसता दगड धोंड्याचा बनलेला नाहीये. त्यात चैतन्य आहे. त्याकडे शौर्य आहे, तो संवेदनशील आहे, तो रौर्द्र आहे, त्याकडे एक स्वतंत्र नवनिर्माणाची क्षमता आहे. सह्याद्री जिवंत आहे. व तुम्ही जर सह्याद्रीस वचन दिले तर सह्याद्री आनंदुन जाईल. १. गड-किल्ल्यांवर, ट्रेकिंगला जाताना प्लास्टीक नेणे बंद करावे. आपला जो काही कचरा तयार होईल , तो आपण माघारी घेऊन यावे. कित्येकदा हॉल्स किंवा अशाच प्रकारच्या चॉकलेटचे रॅपर्स पायवाटांवर दिसतात. आपण किमान त्यात आणखी भर घालु नये. ट्रेक कसे करावे? काय आहेत ट्रेकिंगचे अद्याप न लिहिलेले नियम? २. सह्याद्रीचा कप्पा तयार करा. ज्येष्ट ट्रेकर श्री आनंद पाळंदेच्या डोंगरयात्रा नावाच्या, पुस्तकामध्ये त्यांनी एक खुप मुल्य असलेले वाक्य लिहिले आहे. “निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्यांशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणींवाचुन काही नेऊ नका !”. मी यापुढे जाऊन आवाहन करतो सर्व ट्रेकर्सना कि चुकुन किल्ल्यावर काही प्लास्टीक सापडलेच, तर त्यातील थोडेतरी आपणासोबत शहरात घेऊन यावे. यासाठी आपल्या ट्रेकिंगच्या सॅक मध्ये एक खास कप्पा करावा, सह्याद्रीसाठी. व प्रत्येक वेळी किल्ल्यावरुन थोडा का होईना कचरा कमी करावा. प्रफुल्लता प्रकाशनचे, आनंद पाळंदेंनी लिहिलेले पुस्तक डोंगरयात्रा ३. दगडाची चुल करताना, ती चुल मोकळ्या मैदानात करु नये., गवताच्या मैदांनापासुन, दुर अंतरावर चुल करावी. चुल पेटवण्याच्या अगोदरच चुलीच्या चारही बाजुंचे सर्व गवत काढुन घ्यावे. शेकोटी बाबतीत देखील असेच करावे. शक्य झाल्यास, हल्ली चुल करणे टाळावे. हल्ली अगदी छोटे छोटे , ने आण करण्यास सोपे व वजनाने हलके गॅस वर चालणारे स्टोव्ह सहज ऑनलाईन उपलब्ध होतात. शक्यतो त्यांचा वापर करावा. यामुळे आपण वृक्षतोडी देखील टाळु शकतो. सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी. आजुबाजुचे गवत काढुन मगच चुल पेटवावी ४. ट्रेकिंगचा सदस्य संख्या नेहमी ८ पेक्षा जास्त होऊ द्यायची नाही. यामुळे जो कोणी म्होरक्या असतो, त्याला सर्वांवर लक्ष ठेवणे सोपे जाते. व अपघात टाळले जातात. मोहीमेचा एक म्होरक्या नक्की असावा. त्याचा शब्द शेवटचा असावा. काही बाबतीत सदस्यांचे मतभेद होऊ शकतात. पण म्होरक्या जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी अमलात आणण्याची तयारी सदस्यांची असावी. म्होरक्या अनुभवी, इतिहास-भुगोलाविषयी माहिती असलेला, त्यातल्यात्यात जाणकार असावा. सर्वानुमते म्होरक्या ठरवणे, प्रत्येक ट्रेकच्या सुरुवातीच झाले पाहिजे. असे केल्याने सर्वच सदस्य म्होरक्याच्या नजरेच्या टप्प्यात राहतील व अपघात होण्यास प्रतिबंध बसेल. जास्त सदस्य संख्या असेल तर पुढे चालणारा व शेवटी चालणारा यांच्या मध्ये खुप मोठे अंतर पडते. आम्ही ट्रेकींगला सुरुवात केली तेव्हा म्होरक्या सोबतच प्रत्येक वाटचालीच्या वेळी सर्वात पुढे चालणारा जबाबदार मावळा व शेवटी चालणारा जबाबदार मावळा देखील नेमण्याचा प्रघात आनंद पाळंदे, गुलाब
Forts of Shivaji Maharaj
याचा अंदाज गणितीय पध्दतीने बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी कित्येक लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. सह्याद्रीतील अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.
Torna Fort Camping near Pune
  आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो. या वर्षी मात्र ह्या रुप पालटण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. निसर्गशाळेच्या विविध सहलींच्या माध्यमातुन, पर्यटकांमध्ये निसर्गाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. निसर्गातुन, मोकळ्यामैदानातुन चालताना, पायवाट सोडुन चालु नये, कारण पायवाट नसेल तर आपण आपल्या पायाखाली पाने, फुले, वेली, गांडुळ, बेडुक आदींना चिरडण्याची भीती असते. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासुन ते अगदी पर्यावरण संरक्षण संवर्धनात आपापल्या पातळीवर, आपापल्या परीने काय योगदान देता येईल इथपर्यंत माहीती साध्या, छोट्या संभाषणातुन पर्यटकांना सुचवली जाते. अनेकदा अमराठी (प्रसंगी परदेशी देखील) पर्यटक देखील अशा विविध सहलींमध्ये सहभागी होतात. अशा पर्यटकांना सह्याद्री, सह्याद्रीतील संस्कृती, भुगोल आणि त्या सोबतच इतिहासाविषयी देखील माहीती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत असतो. कालच्या पदभ्रमणाच्या सुरुवातीलाच, निसर्गचक्रातील एक बदल, अगदी गाड्या पार्क केल्यावर लगेचच जाणवला. तो म्हणजे बदललेले वारे. शिवकाळात एका इंग्रज वकीलाने तोरण्याविषयी माहीती लिहीताना त्यास गरुडाचे घरटे असे संबोधले आहे. तर मग ह्या गरुडाच्या घरट्यात घोंघावणारा वारा असणारच. हे घरटे समुद्रसपाटीपासुन अंदाजे चार हजार सहाशे फुट उंचीवर आहे. एवढ्या उंचावर वाहणारा वारा देखील तितकाच खमक्या आहे. पावसाळ्यात हा वारा पश्चिमेकडुन पुर्वेकडे वाहताना आम्ही अनुभवलाय. ह्या वा-याचा अनुभव घ्यायचा असेल तर किल्ल्यावर चढताना रेडे पट्ट्यावर थोडे थांबावे. तसा वारा सगळीकडेच असतो.पण रेडे पट्ट्यावर हा वारा किल्ल्याच्या सोंडेला धडकुन अजुन वर उभारी घेतो. व नेमके पायवाटेवरच आपल्याला ह्या वा-याचा आनंद घेता येतो. रेडे पट्ट्यापासुन पुढे उभी चढण सुरु होते. कडा अंगावर येतो. ही वाट आपणास कोठी दरवाज्यातुन गडावर घेऊन जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, मुरुमाच्या रेती मुळे व मातीतुन मोकळ्या झालेल्या लहान मोठ्या खड्यांमुळे नवख्या माणसास जरा अवघड जाते. आमच्या ग्रुपमध्ये देखील काही नवखे होतेच. त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. रेडे पट्टा सोडल्यावर घोंघावणारा वारा देखील मागे, खालीच राहतो. गुरुत्वाकर्षाच्या विरुध्द दिशेने, पुणे परीसरातील सर्वात उंच पर्वत चढताना दमायला होते. प्रत्येक श्वास-प्रश्वासागणिक शरीरातुन अशुध्दी बाहेर पडत असते. पायवाटेच्या उजवीकडे, भट्टी वागद-या कडील दरीची भीती केव्हाच संपलेली असते. श्वासाची गती वाढलेली असते. आकाशातुन सुर्याची भट्टी डोंगर द-यांसहीत आपल्या अंगा-प्रत्यंगास भाजुन काढीत असते. अंग घामाघुम झालेले असताना , अचानक एखादी वा-याची हलकी झुळुक आलीतर जणु सह्याद्रीनेच पुढे येऊन मला मिठित घेतले की काय असे वाटते. सह्याद्रीला त्याच्या लेकराची काळजी आहे. व त्याला थोडा दिलासा देतो. ही वा-याची झुळुक तापलेल्या, घामाघुम झालेल्या अंगावर हलकेच थंडावा आणते. आता आम्ही डोंगर मातीची चढाई संपवुन, कातळ कड्याच्या पायथ्याशी आलो. आता गड अगदी टप्प्यात आला होता. कातळकड्याची चढण सुरु होण्यापुर्वी, डावी हाताला, कातळातुन झिरपणारे पाणी वेगवेगळ्या कड्या कपारीतुन खाली ठिबकते. तेथे, कुणीतरी, वरुन खाली येणारे सर्व पाणी, एका लोखंडीपाईप मध्ये जमा करुन एक पाण्याची धार तयार केली होती. सर्वांनी पाणी प्यायले. कातळातुन झिरपत येणारे पाणी अतिशय थंड व मधुर होते. जसे आम्ही कोठी दरवाजातुन गडावर दाखल झालो तसे आणखी बदल जाणवला. तो म्हणजे गडावरील स्वच्छता. आम्ही गडाच्या द्वारातच होतो तितक्यात तेथे आणखी एक ग्रुप गडा खाली उतरण्याच्या तयारीत होता. त्यात वीसेक लहान मुल आणि ३-४ तरुण होते. त्यातील एक तरुण मुलांना पैकी एका कडे पाहुन त्याला विचारीत होता की तुमचे गणशिक्षक कुठे आहेत. एवढ्या वरुन मला समजले की हा नुसत्या पर्यटकांचा जथ्था नसुन हे तर कार्यकर्ते मंडळी आहेत. त्यांची थोडी फीरकी घ्यायचे ठरवले. मी त्यांना विचारले, “तुमचा कचरा कुठय? कचरा नाही ना केला गडावर तुम्ही?” त्यावर त्यातील एक कार्यकर्ता सांगु लागला की ते सगळे मिळुन ५०-६० जण आहेत. व ते कचरा करण्यासाठी आलेले नसुन गडावर साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत. मी “बर बर”, म्हणुन गुगली टाकली, “तुम्ही ते हाप चड्डी वाले का?”. ह्या प्रश्नावर बाकी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. उत्तर कोण देणार हे त्यांनी एकमेकांशी न बोलताच ठरवले. त्यांच्यातील आणखी एक चुणचुणीत तरुण, थोडा पुढे येऊन “हो” म्हणाला. मी, “बर बर…असु दे. काही काही हाप चड्डीवाले चांगले असतात, की जे अशी किल्ले साफ सफाईची कामे करतात.” तो तरुण, “तस नाही काका(हल्ली काकाच म्हणायला लागलेत ब-यापैकी अनोळखी तरुण देखील. लहान मुलांनी काका म्हंटले तर ठिक आहे, पण तरुण देखील…वय व्हायला लागलय आता) . सगळेच हाफ चड्डीवाले चांगले असतात. आता तुम्हीच बघा की हे सगळे कार्यकर्ते, मुले, स्वयंसेवक वेळ, श्रम आणि स्वतचा पैसा खर्च करुन इथपर्यंत येऊन गड साफ करतात. आणि यात कसलाही स्वार्थ नाहीये यांचा ” माझ्याकडे देखील वेळ कमी असल्याने मी जास्त फिरकी घेण्यच्या फंदात न पडता, त्यांना रामराम करुन आम्ही मेंगाई देवीच्या मंदीराकडे निघालो. तेवढ्यात आणखी एक ग्रुप मला भेटला. तो देखील खाली उतरत होता. ह्या ग्रुप मध्ये सगळे हिंदी भाषिक तरुण मुले होती. मी त्यांना ही हटकले व कच-या विषयी विचारणा केली. त्यांनी तर लगेच पाठीवरची सॅक खाली काढुन त्यातील त्यांचा स्वतःचा कचरा दाखवला व मला आश्वस्त केले की ते लोक कचरा पुण्यापर्यंत नेऊन त्यांच्या घराच्या आसपासच्या कचरा पेटीतच टाकणार. मेंगाई देवीच्या मंदीरापाशी आम्ही झाडाखाली थोडा आराम आणि खाऊ पिऊ केल. अमराठी पर्यटकांना किल्ला दाखवणे, त्याचा इतिहास सांगणे हे तर चढाईला सुरुवात केल्यापासुन सुरुच झालेले होते. आता वेळ आली होती ती किल्ल्यावरील वेगवेगळी ठिकाण दाखवण्याची. सगळा गड फिरुन त्यांना दाखवला. आम्ही कोकण दरवाज्या ने उतरुन बुधल्या ला जाऊन आलो. येताना अचानक एक पर्यटकाने आश्चर्याने मला समोरील टेहाळणी बुरुज दाखवीत उत्साहात म्हणाला, “ सर ये तो सही मे हाथी ही है!! वॉव, अनबीलीव्हेबल!!!” असे म्हणत तो ग्रुप मधील सर्वांना त्याला दिसलेला हत्ती दाखवु लागला. आणि ते होते ही खरेच. आमच्या समोर हत्तीच होता. पण हा हत्ती तयार केला होता शिवाजी राजांच्या हरहुन्नरी मावळ्यांनी. एका कातळालाच हत्तीच्या तोंडाचा आकार देण्यात आला आहे. त्या कडे नीट पाहील्यावर समजते की त्या हत्तीच्या तोंडाला कान आणि दात देखील होते. पण आता ते कान आणि दात नीटसे दिसत नव्हते. नीट निरीक्षण केले तरच ते दिसतात. आणखी बारकाईने पाहीले तर समजते की हा दगडाचा डोंगर मुळातच ह्या आकाराचा नव्हता. पण कारागीरांनी आकार पाहुन त्यास हत्तीच्या मुखासारखे केले होते. कातळावर छन्नीचे घाव अजुनही दिसत आहेत. वर ते काही पाच दहा फुट उंचीचे हत्तीचे मुख नव्हते. १०० फुटापेक्षा जास्त उंच असे ते विशाल हत्तीचे मुख. पडलेले कान, दात, कपाळ, डोळे, आणि सोंड अगदी स्पष्ट पणे दिसत आहे. आपण कधी तोरण्यावर गेलाच तर आवर्जुन हे हत्तीमुख पहाच. यास हत्ती माळ असे सध्या म्हणतात. मला असे वाटते की माळ असा नंतरच्या काळात त्या नावाचा अपभ्रंश झाला असेल. ह्या हत्तीमुखाच्या माथ्यावर एक माळा आहे. हत्तीच्या अंबारी च्या समोर, माहुत ज्या ठिकाणी बसतो अगदी त्याच ठिकाणी एक टेहळणी बुरुज आहे. व बाल्कनी/माळा सदृश्य अशा या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील वीसेक फुटाचा भुयारी मार्ग आहे. कित्येक वर्षापुर्वी तोरण्यावर आम्ही आलेलो. तेव्हा असा माळ किंवा
हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]