पर्यावरण पुरक वस्तु की जीवन? इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना, अन्न पदार्थांना इकोफ्रेंडली हा टॅग किंवा विशेषण लावले जात आहे. हल्ली वस्तु पर्यावरण पुरक बनत आहेत. हे खुप चांगले आहे. पण काय तुम्हाला माहिती आहे का निव्वळ वस्तु पर्यावरण पुरक बनवुन भागेल अशी वेळ आता नाही राहिलेली. आता वेळ आली आहे कुटूंबे पर्यावरण पुरक बनण्याची. उभे जीवनच पर्यावरण पुरक बनण्याची व बनविण्याची. थोड नवीनच वाटतय ना? आणि थोडं कठीण किंवा काहींना तर अशक्य देखील वाटत असावं. चला तर मग आज आपण भेटुयात पर्यावरण पुरक जीवन ते देखील शहरी जीवन जगण्याचा मनापासुन प्रयत्न करणा-या एका गृहिणीला. ही गृहीणी माता आहे, पत्नी आहे आणि विशेष म्हणजे ती कुशल व्यावसायिक देखील आहे. कदाचित काहीशे वर्षांपुर्वी अथवा हजारेक वर्षांपुर्वी भारतात राहणारे प्रत्येक ग्राम अथवा नगरवासी कुटूंब आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन पर्यावरण पुरकच असेल. त्याकाळात पर्यावरण तज्ञ नसतीलच बहुधा तरीही प्रत्येक घर पर्यावरणाला पुरक असे जीवन जगत असेल. हे इतके ठामपणे सांगता येऊ शकते कारण अश्या पर्यावरण पुरक जीवनाची काही लक्षणे अजुनही खुप दुर्गम भागात असणा-या वाड्या / पाड्यांमध्ये दिसतेच. आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का? पण आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का? आणि जर शक्य असेल तर असे कुणी खरच केलं आहे का? करीत आहे का? भारतात आणि जगात देखील आज अशी अनेक उदाहरणे आहेत, कुटूंबे आहेत की ज्यांनी शहरी जीवन सोडुन गावखेड्यांकडे जाणे निवडले आहे. निसर्गाशी मिळते जुळते घेऊन, गरजा कमी कमी करीत, कधी कधी स्वतःचे अन्न स्वतः पिकवुन, अशी मंडळी स्वतःचे आयुष्य सुखाचे करीत आहेत. अनेक वर्षे शहरी जीवनाची सवय असताना निसर्गात जाऊन राहणे, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, अनेक अडचणींना तोंड देणे, त्यांवर मात करणे हे खुपच जिकिरीचे आणि जिद्दीचे काम आहे. कदाचित सर्वांना हे जमणार नाही, जमतदेखील नाही. बरोबर ना? सामान्य की असामान्य? महात्मा गांधी असो वा बाबा आमटे असो यांना ते जमले, त्यांनी केले, आजही अनेक जण आहेत की जे असे करीत आहेत. पण झाली असामान्य व्यक्तिमत्व असलेली माणसे. अश्या एकेका माणसाच्या असामान्य कर्तृत्व मोठे आहे यात शंका नाहीच. पण अश्या एकेका माणसाच्या मोठ्या कर्तृत्वापेक्षा आजच्या काळात जास्त गरज आहे ती म्हणजे सामान्य माणच्या छोट्या छोट्या गोष्टींची. या गोष्टी छोट्या छोट्या असल्या तरीही सामान्य माणसांच्या सहज आवाक्यातील असल्याने एकुण परिणाम एका महान व्यक्तिच्या कर्तृत्वापेक्षा खुप मोठा, खुप परिणामकारक आणि दिर्घकाळ टिकणारा असु शकेल. व्यक्तिरेखा – सौ शीतल तळेकर कदाचित हीच गोष्ट समजली , उमजली असेल आपल्या आजच्या लेखातील सामान्य असुनही असामान्य ध्येय उराशी बाळगलेल्या , पुणे शहरात राहणा-या एका गृहीणीला. त्यांचे नाव आहे सौ शीतल तळेकर. कोविड-१९ आणि त्यामुळे जगात उडालेली धांदल, मृत्युचे तांडव , लॉकडाऊन हे सारे आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतके अचानक आले की त्यावेळी कित्येकांना सावरता आलेच नाही. एक दिवस असा येईल की आपण आपल्याच घरात बंदीवासात राहु अशी कल्पना कुणी स्वप्नात देखील केली नसेल. कोविड१९ ने आपले जग अक्षरशः उलटे पालटे केले, आपले जगणे बदलुन टाकले, आपलं हसणं, रडणं देखील बदलल. आप्तेष्टांच्या अचानक जाण्याचे अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली ती अजुनही तशीच आहे. कित्येक जण जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेपर्यंत जाऊन आले. अनेकांनी त्याही काळात मनुष्यातील दानव पाहिला आणि अनेकांनी मनुष्यातील देवत्व देखील अनुभवले. कित्येकांना या जीवनाची क्षणभंगुरता तात्काळ लक्षात आली आणि कित्येकांना मनुष्याची अगतिकता समजली. कुणी काय तर कुणी काय असे अनेकविध अनुभव सर्वांनीच घेतले. पहिल्याच लॉकडाऊन मध्ये जेव्हा अनेकजण लॉकडाऊन डायरीच्या हॅशटॅग खाली सोशल मीडीयवर पोस्ट लिहित होते तेव्हा शीतल वेगळ्याच विचारात होती. टीव्ही वर बातम्या येत होत्या की लॉकडाऊन मुळे प्रदुषण कमी झाले, शेदोनशे किमी अंतरावरुन हिमशिखरे दिसु लागली इत्यादी तेव्हा शीतल खोल विचारात होती की मनुष्याने उभे केलेले हे कार्यकलाप, हे व्यापार, हे औद्योगिकीकरण, हा चंगळवाद, हा भौतिक उपभोक्तावाद, वापरा आणि फेका संस्कृती हे सारेच खरतर कारणीभुत आहे मनुष्याच्या जीवनाचा एकुणच दर्ज्या खालावण्यासाठी. मनुष्याचे जीवन उन्नत होण्याऐवजी या सा-यांमुळे मनुष्याचेच जीवन सुमार आणि निकृष्ट होत चालले आहे. याला म्हणतात रीयलायझेशन म्हणजेच उपरती, अनुभूती! अशी उपरती अनेकांच होत असते, लॉकडाऊन च्या काळात देखील झाली, त्यापुर्वीही व्हायची , आत्ताही होत असेलच. पण शीतलचे वेगळेपण हे आहे की शीतल तात्काळ या उपरतीप्रमाणे काम करण्याचा, जीवन जगण्याचा संकल्पच नुसता केला नाही तर त्यासाठीचा मार्ग देखील ठरवला. शीतल आणि तिचे कुटूंब पुणे शहरातील उच्चभ्रु उपनगरात वास्तव्यास आहेत. पती एका कॉर्पोरेट मध्ये मॅनेजर आहेत तर दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. मोठी सहाव्या इयत्तेत शिकते तर धाकटी पहिल्या इयत्तेत. लॉकडाऊन सुरु असताना अनेकजण विविध टास्क करुन सोशल मीडीयवर पोस्ट करीत होते तेव्हा शीतल याच सोशल मीडीयावर इको-लिव्हिंग विषयी माहिती घेण्यात व्यस्त होती. अनेक ऑनलाईन कम्युनिटीज ती सदस्य बनली, अनेक डॉक्युमेंटरीज तिने पाहिल्या. इथुन पुढे एकेक वस्तुच इकोफ्रेंडली घेण्यापुरते आपले पर्यावरण प्रेम न ठेवता आपल जगणच, आपलं जीवनच हळुहळू इको-फ्रेंडली कसे करता येईल यासाठी विचार करण्यास तिने सुरुवात केली. प्रॉब्लेम स्टेटमेंट अनेक पर्यावरण प्रेमी, तज्ञ लोक व्याख्यानात औद्योगिकरणास दोष देतात निसर्गाच्या –हासाला पण हे औद्योगिकरण अनेकांच्या आयुष्यातुन काही कमी होत नाही. येनकेन प्रकारेन औद्योगिकरण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे वाहनांने केली जाणारी ये-जा. ही ये-जा मुख्यत्वे करुन घर ते कामाचे ठिकाण अशी असते किंवा घर ते मुलांची शाळा अशी असते. आठवड्यातुन एखाददोन वेळेस भाजीपाला खरेदीसाठी तर महिन्यातुन एखाददोन वेळेस किराणा भरण्यासाठी. एव्हाना शीतलला कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय हे समजले होते आपण स्वतः , आपणा स्वतःकडुन कार्बन फुट-प्रिंट होणारच नाही किंवा कमीत कमी होईल यासाठीचे पहिले पाऊल उचलले ते म्हणजे घर निवडले शाळा आणि पतीचे ऑफीस अश्या दोन्हीही ठिकाणांच्या जवळ. हे कुटूंब केवळ एवढेच करुन थांबले नाही, तर शाळा आणि घर ही ये-जा त्यांनी हळुवार चक्क सायकल ने देखील सुरु केली. दररोज सकाळी नवरा-बायको आपापली सायकल घेतात , मुली देखील त्यांच्या सायकल्स घेतात आणि हे चौघे ही निघतात पॅडल मारत शाळेकडे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाण्याचा हा प्रकार कदाचित तुम्हाला नवीनच वाटला असेल,. बरोबर ना? पण हे खरय आणि हे कुटूंब सातत्याने असे अगदी दररोज करीत आहे. रोज सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे आरोग्याचे अनेक लाभ या चौघांनाही झाले आहेत, होत आहेत. हे म्हणजे दुधात साखरे सारखेच झाले की नाही? शीतलशी गप्पा मारताना एक शब्द नव्याने मला समजला . तो म्हणजे ‘कॉन्शीअस लिव्हिंग’. त्यालाही अधेमध्ये शीतल – इको हे विशेषण लावताना देखील मी ऐकले. ‘इको कॉन्शीअस लिव्हिंग’. मराठीत सांगायचे झाले तर याला ‘पर्यावरण दृष्ट्या सतर्क जीवन’ असे म्हणता येईल. ही सतर्कता म्हणजे नक्की काय बरे? शीतल सांगते की आपले कोणत्याही वागण्याने, वर्तनाने, कृतीने पर्यावरणाचे नुकसान तर होत नाही ना याविषयी सजग असणे म्हणजे कॉन्शीअस लिव्हिंग. खुप छोट्या छोट्या गोष्टी
Hemant Vavale Basic Mountaineering Course Award
कसेबसे स्नो-क्राफ्ट पुर्ण झाले, आईस क्राफ्ट झाले, असे पंधरा दिवस बर्फात आम्ही राहिलो. सर्वात शेवटचा कार्यक्रम तो म्हणजे हिमशिखरांवर चढाई करीत जास्तीत जास्त उंची गाठायची. याला हाईट गेन असे म्हणतात. हाईट गेन म्हणजे एक प्रकारे शिकलेल्या सर्व कौशल्यांची परिक्षाच होय. सकाळचे सर्व कार्यक्रम उरकुन आम्ही पाठीवरच्या सॅक भरु लागलो. सर्व जण तयार झाले. मी झालो माझी सॅक घेऊन. आणि इतक्यात एक गडबड झाली. माझ्या पोटात खळगा पडला आणि ...
Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.
रोहिणी ओळखण्याची आणखी एक सोपी पध्दत म्हणजे मृगनक्षत्र तारे समुहातील व्याध, व्याधाने मारलेल्या बाणातील पहिला तारा अश्या दोन ता-यांना जोडणारी रेष सरळ पश्चिमेकडे वाढवली तर ती पुढे ज्या ता-याला मिळेल तो म्हणजे रोहिणी नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा.
सुर्यसिद्धांत नावाच्या एका अतिप्राचीन खगोलविषयक भारतीय ग्रंथामध्ये रोहिणी शकट भेदन नावाने या खगोलीय घटनेविषयी लिहिलेले आढळते. वराहमिहिर नावाच्या भारतीय खगोल अभ्यासकाने बृहत संहिता नावाच्या त्याच्या ग्रंथामध्ये देखील रोहीणी शकटा भेदन या खगोलीय घटनेविषयी लिहिले आहे. त्यानम्तर ग्रहलाघव नावाच्या एका ग्रंथामध्ये देखील रोहिणी शकट भेदन विषयी लिहिलेले आढळते. सुर्यसिद्धांत (हे पुराण नव्हे) ग्रंथांमध्ये रोहीणीचे आकाशातील स्थान नक्की कुठे आहे याविषयी काय सांगितले आहे ते आपण पाहुयात.
हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]