शरद पोर्णिमा; १९ ऑक्टोबर २०२१
वार – मंगळवार
शरदाच्या टिप्पुर चांदण्यात न्हाऊन निघण्याची वेळ आली आहे, रात्रभर जागे राहुन चुलीवरील आटवलेल्या दुधाचा आस्वाद घ्यायची वेळ आली आहे.
याच रात्री निसर्गशाळा सुरु करील या हंगामातील आकाशदर्शनाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात. याच रात्री घ्या क्षितिजावर उगवणा-या मनमोहक पुर्णचंद्राचे ‘मोठ्ठ्या’ दुर्बिणीतुन दर्शन. सोबतच आमच्या तज्ञांकडुन ऐका चंद्र कसा बनला याची ज्ञानवर्धक व रोचक माहिती, ती ही गप्पा टप्पांच्या रुपात.
हिवाळ्याची ऊबदार थंडी देखील तुम्ही या रात्री अनुभवू शकता.
प्रवेश फी – १२०० रु प्रत्येकी
समावेश – रात्रीचे जेवण, आटवलेले दुध, सकाळी चहा नाश्ता
कोविड-१९ मुळे मर्यादीत प्रवेश दिले जाणार आहेत याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया
9049002053/9325018421 या क्रमांकावर संपर्क साधु शकता.