आकाशातील चित्तरकथा - रोहिणी

रामायणामध्ये एक कथा येते, त्यात राजा दशरथ रोहिणी शकट भेदन होणे टाळण्यासाठी शनीची आराधना करतो व हा योग टाळतो. हा योग टाळतो म्हणजे पृथ्वीवर येऊ घातलेले एक संकटापासुन बचाव करतो. तसेच भारतीय ज्योतिषामध्ये व पुराणांमध्ये देखील रोहिणी शकट भेद हा योग भयंकर असल्याचे सांगितले आहे. हा योग म्हणजे नक्की काय?

रोहिणी नक्षत्र माहिती मराठीमध्ये
मी निसर्गशाळा येथुन मोबाईल कॅमे-यात टिपलेल्या फोटोमध्ये दिसणारे रोहिणी नक्षत्र, त्या खाली दिसणारा पुंजका म्हणजे कृत्तिका नक्षत्र

सर्वप्रथम आपण हे जाणुन घेऊ की रोहीणी शकट म्हणजे काय? रोहीणी नक्षत्र तुम्ही आकाशामध्ये पाहिले असेलच. उगवताना इंग्रजी A आकारासारखे दिसणारे, कृत्तिकाच्या एक घर खाली/पुर्वेला असणारे हे व मावळताना इंग्रजी V सारखे दिसणारे हे नक्षत्र ओळखण्यास खुपच सोपे आहे. यातील सर्वात तेजस्वी लालसर दिसणारा तारा म्हणजे रोहीणीचा तारा अथवा रोहीणी नक्षत्राचा तारा. या ता-याचा लाल रंग उघड्या डोळ्यांना देखील स्पष्ट दिसतो. अर्थात हे सर्व पाहण्यासाठी, दिसण्यासाठी तुम्ही प्रकाशप्रदुषणापासुन दुर गेले पाहिजे. या इंग्रजी A अथवा V सारख्या दिसणा-या नक्षत्रालाच प्राचीन भारतीयांनी शकट असे म्हंटले. शकट म्हणजे बैलगाडी, बैलगाडा अथवा खाट. आकाशातील ता-यांना रेषांनी जोडुन , आकृत्या बनवुन, त्या आकृत्यांना एखाद्या परिचीत वस्तुशी जोडुन ठेवणे ही प्राचीन पध्दत आहे त्या त्या नक्षत्रास ओळखण्याची. रोहीणी शकट म्हणजे काय हे तुम्हाला समजले असेलच. चला आता आपण भेदन या शब्दाचा अर्थ समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात. शकटाला छेद देत एखादा ग्रह (शनी, मंगळ अथवा गुरु) जर जात असेल, म्हणजे शकटातील , त्या आकृतीमधुन जाताना दिसत असेल तर समजायचे शकटाचे भेदन झाले आहे. तर अशाप्रकारे जेव्हा कधी शकटाचे भेदन होईल किंवा होते तेव्हा तेव्हा प्रलय येतो, दुष्काळ पडतो, विनाश होतो असे एकसुराने पौराणिक व ज्योतिषीय साधने सांगतात.

सत्यशोधन प्रयत्न

चला आता आपण हे पाहुयात हे किती खरे आहे वा निव्वळ वदंता आहे. सर्वप्रथम आपण हे समजुन घेतले पाहिजे की रोहिणी शकट भेदन खरोखरी होते की नाही, असे भेदन शक्य आहे का? ग्रह व दिसणारे सारेच्या सारे तारे आकाशामध्ये एक ठराविक मार्ग क्रमितात. त्यांचा मार्ग ecliptic म्हणजे क्रांतीवृत्ताशी संलग्न असतो. वर्षानुवर्षे मी आकाश पाह्तोय पण हा मार्ग बदलेला कधी समजला नाही. उदा – रोहीणी शकट आकाशात आहे तरी नक्की कुठे व क्रांतीवृत्ताच्या संदर्भाने त्याचे स्थान निश्चित करता येते का ते आपण पाहुयात.

Observation data

Epoch J2000.0      Equinox J2000.0

Constellation  Taurus

Pronunciation /ælˈdɛbərən/[1][2]

Right ascension      04h 35m 55.23907s[3]

Declination    +16° 30′ 33.4885″[3]

Apparent magnitude (V)     0.75–0.95[4]

Declination +16 चा अर्थ आहे क्रांतीवृत्तापासुन १६.३०.३३.४८ अंश उत्तरेकडे.

आधुनिक खगोलशास्त्र रोहीणीचे आकाशातील स्थान वरील प्रमाणे सांगते तर प्राचीन भारतीय खगोलशास्त्र याविषयी काय म्हणते ते आता आपण पाहुयात.
.

सुर्यसिद्धांत नावाच्या एका अतिप्राचीन खगोलविषयक भारतीय ग्रंथामध्ये रोहिणी शकट भेदन नावाने या खगोलीय घटनेविषयी लिहिलेले आढळते. वराहमिहिर नावाच्या भारतीय खगोल अभ्यासकाने बृहत संहिता नावाच्या त्याच्या ग्रंथामध्ये देखील रोहीणी शकटा भेदन या खगोलीय घटनेविषयी लिहिले आहे. त्यानम्तर ग्रहलाघव नावाच्या एका ग्रंथामध्ये देखील रोहिणी शकट भेदन विषयी लिहिलेले आढळते.

सुर्यसिद्धांत (हे पुराण नव्हे) ग्रंथांमध्ये रोहीणीचे आकाशातील स्थान नक्की कुठे आहे याविषयी काय सांगितले आहे ते आपण पाहुयात.

सुर्यसिध्दांतातील रोहिणीशकट भेद:

वृषे सप्तदशे भागे यस्य याम्योंड्शकद्दयात्‌ ।

विक्षेपोह भ्यधिको भिन्द्याद्रोहिण्या: शर्कंट तु स:।। १३ ॥

बृहत संहितेत काय लिहिले आहे ते आपण आता पाहु

रोहिणीशकटमर्कनन्दनो यदि भिनत्ती रुधिरोथवा शिखी ।
किं वदामि यदनिष्टसागरे जगदशेषमुपयाति संक्षयम ।। ४७.१४

तर यानंतरच्या काळातील ग्रहलाघव ग्रंथ देखील असेच म्हणतो सोबत असेही सांगतो की असा रोहीणी शकट भेदन योग युगांपुर्वी झाला आहे व नजीकच्या काळात देखील असे होईल याची खात्री नाहीये असेच ग्रहलाघव ग्रंथात म्हंटले आहे. असे म्हणताना त्याचा आधार काय सांगितला आहे तर आत्ताची आकाशातील ग्रहांची स्थिती पाहता भेदन खुप खुप पुर्वी झाले असावे असे मत ग्रहलाघव मांडते.

आत्ताच्या काळातील काही अभ्यासकांनी या विषयावर संशोधन केले. संगणकीय अल्गॉरोदम चा उपयोग करुन यापुर्वी एखादा ग्रह नक्की रोहीणी नक्षत्रातुन आरपार गेला होता का या विषयी संशोधन केले व असे रोहीणी शकट भेदन यापुर्वी झाले होते याचा ठोस पुरावा मिळतो.

असे शकट भेदन भुतकाळात झाले आहेत व भारतीयांनी शकट भेद योग लिहिला अथवा मौखिक परंपरेने जपला याचा आधार केवळ दंतकथा नाही तर प्रत्यक्ष अवकाशीय निरीक्षणे आहेत असा याचा सरळ सरळ अर्थ होतो.
खालील व्हिडीयो मध्ये तुम्ही पाहु शकता कश्याप्रकारे आधुनिक अभ्यासकांनी शकट भेद प्रत्यक्ष निरीक्षणे असल्याचे सिध्द केले आहे.

शकट भेदन ही केवळ पुराणातील वाणगी नसुन प्रत्यक्ष निरीक्षणे आहेत हे तर आपणास आता समजले . आता पुढे आपण हे समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात की काय खरोखरी शकट भेदन होत असेल तर प्रलय येतो, विनाश ओढवतो?

TIFR – Tata institute of Fundamental Research या संस्थेने शकट भेदन आणि प्रलय यांचा अभ्यास केला. त्यात भुगर्भ शास्त्राच्या काही सिध्दांतानुसार, समुद्राच्या पाण्याची पातळी कधी कधी वाढली असावी याबाबत ठोकताळे मांडता येतात. TIFR मध्ये या अभ्यासात नेमके हेच शोधले गेले व समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याच्या घटना भुतकाळात दोन वेळा घडल्या असल्याचे नमुद केले त्यातील पहिली इस वी सन पुर्व दहाव्या सहस्त्रकात तर दुसरी सहाव्या सहस्त्रकात. व शकट भेदन या दोन्ही सहस्त्रकांत झाल्याचे देखील आपण वर पाहिले आहे. TIFR चा अभ्यास पुढे जाऊन हे देखील म्हणतो की कदाचित या काळाच्या आसपास भुकंप, महाभयंकर पर्जन्यवृष्टी देखील होऊन सरस्वती नदीच्या परिसरातील हडप्पा नाहीसे झाले.
TIFR चे संशोधन तुम्हाला खालील लिंक वर वाचता येईल.

TIFR चे संशोधन

रोहिणी नक्षत्र व तारा या विषयी अजुनही बरेच काही आपणास जाणुन घ्यायचे आहे, हे नक्षत्र आकाशात नक्की कुठे असते, कसे दिसते, उघड्या डोळ्यांनी कसे ओळखायचे, ते किती दुर आहे अशी बहु माहिती आपण पुढील भागात पाहुयात.

धन्यवाद
हेमंत ववले

Facebook Comments

Share this if you like it..

2 Responses

  1. निलेश पांडुरंग बोराटे says:

    आत्ता संध्याकाळी कृतिका, रोहिणी, मृग, आद्र अशी नक्षत्र उघड्या डोळ्यांनी दिसत आहेत

    • Hemant says:

      अगदी बरोबर, सुरुवात अश्विनी नक्षत्रापासुन होते

Leave a Reply to निलेश पांडुरंग बोराटे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]